पांगरमल पुन्हा हादरले
अहिल्यानगर:
तालुक्यातील पांगरमल येथे शेळ्या चोरीच्या संशयावरून एका पारधी समाजाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी पांगरमल येथे विषारी दारूच्या सेवनाने काही लोकांचा मृत्यू झाला होता घटना राज्यभर गाजली होती. त्यामुळे आता या घटनेने पुन्हा पांगरमल हादरले आहे.
चांगदेव नामदेव चव्हाण वय 25 वर्ष राहणार पखोरा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून बुधवारी रात्री शेळ्या चोरून नेल्याच्या संशयावरून एका महिलेसह चौघांना गावातील वीस पंचवीस जणांच्या जमावाने बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये चांगदेव चव्हाण याचा मृत्यू झाला या प्रकरणी पांगरमलच्या सरपंचासह वीस-पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या