अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे  यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. अंबादास दानवेंच्या निलंबनात दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून अंबादास दानवे सभागृहात येणार आहे. दानवेंच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली. त्यानंत हा निर्णय घेण्यात आला आहे.अंबादास दानवेंनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती. अंबादास दानवेंच्या निलंबनांच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवेंच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. 
निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे काय म्हणाले?
निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे म्हणाले, मला असं वाटतं की, निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर त्यांनी केला आहे. हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं असं नाही . मी दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घेतले .उद्यापासून मी सभागृहात जाईल, तसेही आता चार ते पाच दिवस उरले आहेत. मला जरी तीन दिवस सभागृहात येऊ दिलं नाही तरी मी माझा जनता दरबार सुरू ठेवला. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या