दूध दराबाबत लवकरच नवीन कायदा -अमित शाह यांचे महसूल मंत्री विखे पाटील यांना आश्वासन, दिल्लीत घेतली भेट

आज राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्लीत अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देशाच्या गृह आणि सहकारमंत्री पदी पुन्हा विराजमान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

केंद्र सरकारच्या माध्यमातून दूध दरासंदर्भात लवकरच कायदा आणून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. आज सकाळी दिल्ली येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शाह यांची सदिच्छा भेट घेतली.
 स्वतः सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.तसेच उसाच्या एफआरपी प्रमाणेच दुधासाठी देखील एमएसपी चा कायदा आणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती केली.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या