Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून

  



कोपरगाव हादरले; जातीय तणाव, प्रशासन सतर्क 


 हिंदू विवाहित तरुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कोपरगाव शहरात एका तरुणाचा खून करण्यात आला. जमावाने अतिशय निर्गुण पद्धतीने हा खून केला. त्यातील तिघांना पोलिसांनी रात्रीच अटक केली. दरम्यान या खून प्रकरणामुळे कोपरगाव शहरात जातीय तणाव निर्माण झाला असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. 

सोहेल हरून पटेल असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 28 वर्षीय सोहेल भूमी अभिलेख कार्यालयाजवळील आयेशा कॉलनीत राहतो. मुख्य आरोपीच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रविवारी रात्री हा खून झाला. आरोपी मच्छीन्द्र सोनवणे, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी व त्याचा अनोळखी मित्र, योगेश जाधव उर्फ योग्या आदींनी चाकू, लाकडी दांडके,लोखंडी खिळे असलेला बांबू आदींच्या सहाय्याने जावेद समशेर शेख यांच्या प्लॉटमध्ये सोहेलला अमानुष मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

खुनाच्या घटनेनंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला. माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी यावेळी 'आमचीही मुले हत्यार उचलतील' असा इशारा दिला. 

या घटनेनंतर कोपरगावात जातीय-धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित महिलेचा जबाबही पोलिसांनी नोंदविला आहे. 


राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी लक्ष्मण जावळे कोपरगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या