श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजूरी येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 124 वी जयंती उत्साहात साजरी

राजुरी प्रतिनिधी:- (योगेश कडस्कर )
राहाता तालुक्यातील राजुरी येथे सहकारी साखर कारखानदारीचे आदय जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 124 वी जयंतीनिमित्त सकाळी फेरी काढण्यात आली प्रारंभी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित फोटो प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राखीप्रदर्शननाचे उदघाटन प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री मारूती पा गोरे व प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय आरोटे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचे हस्ते पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य श्री सुनील आढाव सर यांनी केले जयंती सप्ताहात घेतलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले कु.भक्ती कसाब कु नव्या म्हसे यानी पद्मश्री विखे पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित मनोगत मांडले तर श्री सुहास धावणे यांनी पदमश्रीच्या कार्याचा आढावा घेतला 
प्रमुख पाहुणे श्री दत्तात्रय आरोटे यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषण श्री मारूती पा गोरे यांनी केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री काकासाहेब गोरे सरपंच सौ संगीता पठारे उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे ,सोसायटी चेअरमन श्री सोपान कदम, व्हाईस चेअरमन श्री सुधीर गोरे श्री तुकाराम गोरे श्री नानासाहेब गोरे भास्कर कदम श्री हौशिराम गोरे श्री सूर्यभान रोकडे, मेजर रमेश रोकडे ग्रामस्थ पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साहेबराव त्रिभुवन यांनी केले तर आभार श्री धावणे सुहास यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख सौ नेहे, सौ पवार, सौ रोकडे, सौ धुलसैदर ,सौ साबळे, सौ त्रिभुवन , श्री राऊत एकनाथ ,श्री बबन सातकर, श्री बाळासाहेब घोरपडे आदींनी प्रयत्न केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या