श्री सिद्धिविनायक पतसंस्था परिवारातील विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाचे भान ठेवत विविध उपक्रम पार पाडत असते. महिलांसाठी स्टार्टअप, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना, महिला आरोग्यासाठी- चला कॅन्सरला थांबू या! या व अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून या संस्था काम करत असतात, अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री.सुनील बोलके यांनी दिली. कार्यक्रमास सैनिक बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे वतीने करण्यात आले आहे.
कारगिल विजय दिनाला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त श्री सिद्धिविनायक पतसंस्था श्रीरामपूर यांचे वतीने सैनिकांचा सन्मान सोहळा
श्रीरामपूर- श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था, श्रीरामपूर यांचे वतीने शनिवार दिनांक ०३/०८/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता अपूर्वा हॉल येथे कारगिल विजय दिनाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व सैनिकांचा व त्यांच्या पत्नी तसेच सैनिकां पश्चात असलेल्या वीरपत्नी /माता यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व चेअरमन श्री. वासुदेव काळे यांनी दिली.
0 टिप्पण्या