वरातीसाठी आलेल्या 52 जणांना अन्नातून विषबाधा नवरदेवासह नातेवाईक,मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु राजुरी येथील घटना.
राजुरी प्रतिनिधी : लग्न समारंभ उरकून घरी परतलेल्या पाहुणे मंडळीना वराती अगोदर जेवण केल्यानंतर काहीवेळाने त्रास होऊ लागल्यामुळे 52 पाहुण्या मंडळीना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना राहता तालुक्यातील राजुरी येथे घटना घडली. तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी व राजुरी गावचे तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष जालिंदर मच्छिंद्र पठारे यांच्या मुलाचा लग्न समारंभ होता.लग्न समारंभ झाल्यानंतर वधू व वरासह आपले घरातील पाहुणे मंडळी आपल्या घरी सुखरूप परतले होते.यानंतर पठारे यांच्या वस्तीवरच वरातीचे नियोजन करण्यात आले.यामध्ये वराती आधी पाहुण्या मंडळींना जेवण केलेले होते.या जेवणानंतर अंदाजे रात्रीला नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान वरातीला सुरुवात झाली.वरात सुरू असतानाच अचानकपणे काही पाहुण्या मंडळींना त्रास होऊ लागल्यामुळे यामुळे घरातील लोकांची पाहुणे मंडळींची मोठी धावपळ उडाली.मात्र एकच पळापळ होऊनकशामुळे काय झाले ? काय होत आहे. हे न समजल्यामुळे अनेकांना तातडीने प्रवरा हॉस्पिटलला रात्री रुग्णालयात दाखल केले.यामध्ये 50 ते 55 पुरुष,महिला,मुले असून या उपचारासाठी नेण्यात आले.तेथे घडलेल्या घटनेमुळे राजुरी व परिसरात मोठी खळबळ उडाली.मात्र जेवणातून विषबाधा झाल्याने 52 प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यात नवरदेवाचाही समावेश असून सर्वाची प्रकृती उपचारा नंतर स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यातआली.यातील काही जणांना मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास जाणवू लागल्याने लक्षात घेऊन त्यांना उपचारासाठी लोणी पाठविले. दुपारी 21 जणांना घरी सोडण्यात आले.अन्नातून झालेली ही विषबाधा असून त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर कोणत्या प्रकारची विषबाधा होती हे आणखी स्पष्ट होईल असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
0 टिप्पण्या