राजुरी (प्रतिनिधी :- योगेश कडस्कर)
राहाता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजूरी येथे स्वतंत्र दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली या प्रभातफेरीमधये विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी मोठया उत्साहाने सहभागी होऊन हातात तिरंगा ध्वज व घोषणा देण्यात आलया
प्रथम ग्रामपंचायत कार्यालय राजूरी जि प शाळा राजूरी वि विकास सोसायटी राजूरी येथे ध्वजारोहण करून प्रभातफेरी विद्यालयाच्या प्रांगणात आली विद्यालयात स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री मारुती गोरे पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गावातील शिक्षणप्रेमी लोकांनी ठेवलेल्या ठेवींच्या व्याजातून बक्षिसे व गणवेशाचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री मारूती गोरे पाटील है होते याप्रसंगी सरपंच सौ संगीता पठारे उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष श्री रामजी लागले पाटील शालेय व्यवस्था पन समितीचे अध्यक्ष अँड काकासाहेब गोरे पाटील श्री प्रकाश गोरे पाटील सोसायटीचे चेअरमन श्री सोपान कदम व्हा चेअरमन श्री सुधीर गोरे श्री भास्कर कदम श्री तुकाराम गोरे पोलिस पाटील श्री रावसाहेब गोरे जि प शाळा मुखयाधयापक श्री त्रिभुवन सर विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनिल आढाव सर शिक्षक विद्यार्थी ,ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास धावणे यांनी केले आभार श्री बबन सातकर यांनी मानले सर्वांना खाउवाटप करण्यात आले
0 टिप्पण्या