श्री गंगागिरी इंटरनॅशनल स्कूल वाकडी येथे 78 स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ममदापूर प्रतिनिधि (योगेश कडस्कर ) :-
78 वा. स्वातंत्र्य दिन श्री गंगागिरी इंटरनॅशनल स्कूल वाकडी या ठिकाणीं मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष श्री .निलेश वसंतराव कासार सर हे होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच वाल्मीक गोरे बाळकृष्ण पठारे, कैलास कळमकर व दिपश्री चोळके व पालक उपस्थित होते. 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 08.00 वा. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली यावेळी राष्ट्रगीत ,वंदेमातरम् झाले त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्याचे कौतुक केले . यानंतर शिक्षकांनी प्रेरणादायी भाषणे केली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एकता,शांती व देशभक्तीचा संदेश दिला होता.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पालकांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या