श्रीरामपुरात महायुती सरकारच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बहिष्कार


भाजपकडून युती धर्म पाळला जात नाही : बोर्डे



श्रीरामपूर :


शहरांमध्ये आज महायुती सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचे कार्यक्रम पत्रिकेत व कोनशिलेत नाव नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येथील भाजप व  प्रशासनाकडून जाणून-बुजून टाळले जात असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी व्यक्त करून आज होणाऱ्या या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामपूर च्या वतीने बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बोर्ड, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील व शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, युवक अध्यक्ष अँड. संदीप चोरगे युवक शहराध्यक्ष तोफिक शेख यांनी सांगितले आहे की राज्यामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे महायुती सरकार आहे वरच्या लेवलला सर्व प्रकारचे प्रोटोकॉल पाळले जातात मात्र येथील भाजपा व प्रशासनाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला जाणून-बुजून टाळले जाते काही दिवसापूर्वी संजय गांधी समितीची रचना झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला घेतलेले नाही. तसेच नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचीही समिती गठित करण्यात आली.


 मात्र या ठिकाणीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला स्थान दिलेले नाही या ठिकाणी भाजप व प्रशासनाकडून युतीधर्म पाळला जात नाही. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस श्रीरामपूरच्या वतीने अनेक वेळा भाजपाच्या वरिष्ठांना ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

 मात्र अद्यापही त्यांनी यामध्ये कसल्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रोटोकॉल प्रमाणे विश्वासात घेणे गरजेचे होते. तसे न झाल्यामुळे आज होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येत आहे.

येथून पुढील काळात जर सुधारणा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामपूर हे एकला चलो रे ची भूमिका घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बोर्ड, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील व शहराध्यक्ष अभिजीत लिपटे,युवक अध्यक्ष अँड. संदीप चोरगे,युवक शहराध्यक्ष तोफिक शेख यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या