मोठी बातमी : नवविवाहित जोडप्याने घेतला गळफास

 


अहमदनगरमध्ये नवविवाहात जोडप्याने घेतला गळफासः झाडाला लटकलेले आढळले मृतदेह, 

3 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

नगर :

एका नवविवाहित दाम्पत्याने अहमदनगर मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील महालदरा इथे ही घटना घडली आहे. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी या नवदाम्पत्याची नावे आहेत. हे दोघेही पुण्यात नोकरीला होते. 


मात्र गावी झाडाला गळफास घेत या दोघांनी आपले जीवन संपवले. रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

 याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच दोघांच्या मृतदेहा जवळ कोणतीही चिठ्ठी मिळाल्याची माहिती नाही.



वैभव आमले आणि स्नेहा आमले या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वैभव आमले हे पुण्यातील चाकण इथं नोकरीस होते. दोन दिवसांपूर्वी नुकतंच दोघंही आपल्या गावी साकूरला आले.  अचानक दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन जीवन संपवलं. मात्र या दोघांनी आत्महत्या का केली ? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या