विज्ञान नाट्य महोत्सव श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे ८ ऑगस्ट २०२४ वार गुरुवार रोजी संपन्न

राहाता तालुक्यातील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग,राहाता तालुका गणित आणि विज्ञान संघटना व राहाता पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान नाट्यमहोत्सव श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे ८ ऑगस्ट २०२४ वार गुरुवार रोजी संपन्न झाला .

विज्ञान नाट्य महोत्सवाचे उ‌द्घाटन राहता तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णुपंत कांबळे साहेब यांच्या हस्ते पार पडले प्रमुख अतिथी म्हणून लोकनेते खासदार बाळासाहेब विखे पाटील (प‌द्मभूषण) उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण समन्वयक प्राध्यापक श्री नंदकुमार दळे सर हे होते या प्रसंगी प्राचार्य श्री सुनील आढाव सर, श्री अनिल लोखंडे सर राहता तालुका विज्ञान संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय उंबरकर सर तालुका गणित संघटनेचे अध्यक्ष्या वैशाली रोकडे मॅडम, बाभळेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख हासे सर आधी उपस्थित होते.सदर नाट्य स्पर्धेत तालुक्यातील 17 संघांनी भाग घेतला होता नाट्य स्पर्धेसाठी खालील विषय ठेवण्यात आले होते एक जागतिक जल संकट, AI तंत्रज्ञान आणि समा, आपत्ती व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आरोग्य आणि स्वच्छता हवामान बदल व परिणाम या स्पर्धेत 17 संघांनी सहभाग नोंदविला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. कल्पना नेहे, श्री सुहास धावणे सर व श्री. महेंद्र जेजुरकर सर यांनी काम पाहिले
सदर स्पर्धेतप्रथमः-श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी जागतिक जल संकट द्वितीय प्रवरा कन्या विद्या मंदिरतृतीय :- जिल्हा परिषद शाळा अस्तगाव तर*उत्तेजनार्थ :- श्री लक्ष्मीनारायण विद्यालय वाकडी व प्रवरा माध्यमिक विद्यालय दुर्गापुरसदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास धावणे सर यांनी केले सदर स्पर्धेसाठी तालुक्यातील विज्ञान शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री. शिवाजी गोरे सर यांनी आभार प्रदर्शन मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या