हिंदुत्ववादी संघटनेकडून मारहाणीचा निषेध
श्रीरामपुरात तणाव
श्रीरामपूर -
येथील बसस्थानक परिसरातून कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी गाड्या आडवल्या होत्या सदरची घटना गुरुवारी रात्री शहरात घडली. त्यामुळे काल रात्रभर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीसांनी गाड्या चालकांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आले असता तेथे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले.
घटनेची माहिती अन्य गोरक्षक हे पोलीस ठाण्याकडे धाव घेतली मात्र त्यावेळी पोलीस ठाण्यातच त्या कार्यकर्त्यांनी गोरक्षकांवरती हल्ला केल्याची घटना घडली.यावेळी शहर पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमा झाला होता. वार्ड २ मध्ये मौलाना आझाद चौकात मुस्लिम समाजाचा एक गट जमा झाला. त्यामुळे काल रात्रभर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे या घटनेचा हिन्दूत्वादी संघटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून संबंधित हल्लेखोर तरुणांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने बंदोबस्त करतो असे पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
0 टिप्पण्या