चितळी परिसरातील आदमाने वस्ती-काकडाई मंदिराच्या परिसरात कामगारांना सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

चितळी (प्रतिनिधि :- प्रविण दरंदले):राहाता तालुक्यातील चितळी येथे मागील तीन दिवसापूर्वी नरभक्षक बिबट्याने चिमुकल्या बालकाचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना याच परिसरातील आदमाने वस्ती व मंडलिक वस्ती परिसरातून बिबट्या येत असल्याचे काही कामगारांच्या निदर्शनास आले आज सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून काकडा आई मंदिराच्या आसपासच्या परिसरात बिबट्या दिसला असुन तो बिबट्या याच भागातील कॅनॉलच्या दिशेने पुढे गेल्याचे प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले आहे
 यापरिसरात संबंधित घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा बिबट्याने अचानकपणे दर्शन दिल्याने नागरिकांच्या चिंतेत दुपटीने वाढ झाली आहे.कामगारांना अचानकपणे बिबट्याचे समोरच दर्शन झाल्याने येथील स्थानिक नागरीक व कामगार अजूनही भयभीत झाले आहेत याक्षणी मानवी वस्तीत बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून नरभक्षक बिबट्याने तीन वर्षाच्या प्रथमेशचा बळी घेतल्याने येथील परिसरात वनविभागाने डोळ्यात तेल घालून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत परंतु बिबट्या हा वनविभागाच्या तावडीत सापडत नसून येथील परिसरात मुक्त संचार करत आहे यामुळे नागरिकांचे जिने मुश्किल झाले आहे 
वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अजूनही ठोस पाऊले उचलण्याची आवश्यकता वाटत आहे बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यपद्धती मध्ये अजूनही भर टाकण्याची गरज आहे परिसरात बिबटे फक्त दिसत नाही तर माणसावर हल्ले ही करतात यामुळे परिसरातील प्रत्येक व्यक्ति भयभीत झालेला आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची होत चालली आहे याचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.मानवी वस्तीच्या आसपास फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी चितळी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे चितळी परिसरात असलेल्या आदमाने वस्ती व आसपासच्या परिसरात वनविभागाने त्वरित लक्ष द्यावे पिंजर्‍याची संख्या वाढविण्यात यावी परिसरात बिबटे जास्त प्रमाणात वाढले असून नागरिकांचे घराबाहेर निघणे ही कठीण झाले आहे मानवी वस्तीत असलेल्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी चितळी-जळगाव परिसरातील समस्त नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या