दरम्यान उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. की त्या दोघांनी मिळून हेल्मेटने या सेवानिवृत्त कर्मचारी सुखदेव गर्जे यांना मारहाण केली त्या मारहाणीत ते खाली पडले व जाग्यावरच गतप्राण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राहुरी शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तात्काळ सुखदेव गर्जे यांना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता ते मृत झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलेदरम्यान वैभव विष्णू फुंदे व सावित्री विष्णू फुंदे हे दोघे महिला व तिचा मुलगा यांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह हवालदार बाबासाहेब शेळके सुरज गायकवाड प्रवीण बागुल राहुल यादव प्रमोद ढाकणे आदिनाथ पाखरे राजेंद्र नागरगोजे व महिला पोलीस कर्मचारी कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राहुरी येथे शनिशिंगणापूर फाट्यावर सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मारहाणीत मृत्यू
राहूरी ( प्रतिनिधी राजेंद्र परदेशी)- राहुरी येथे शनिशिंगणापूर फाट्यावर सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मारहाणीत मृत्यू, मारहाणीप्रकरणी एक महिला व तिचा तरुण मुलगा या दोघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राहुरी येथे शनिशिंगणापूर फाट्यावर दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुखदेव किसन गर्जे ( वय 68 ) यांना एका महिलेने व तिच्या मुलाने शिंगणापूर फाट्यावर मारहाण केली
0 टिप्पण्या