नूतन तंटामुक्ती अध्यक्ष पदी प्रकाश शेळके यांची सर्वानुमते निवड

चितळी: रामपूरवाडी (ता.राहाता) ग्रामपंचायतीत नूतन तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रिया खेळीमेळीत पार पडली. याप्रसंगी नूतन तंटामुक्ती अध्यक्ष पदी प्रकाश शेळके यांची ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड करण्यात आली.
 यापार्श्वभूमीवर युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी नूतन तंटामुक्ती कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे यावेळी रामपूरवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संदीप सुरडकर,कार्याध्यक्ष बबनराव काळे,उपसरपंच मंदाताई काळे,शांताराम शिंदे, विनोद वडने, बाळासाहेब आग्रे,भागवत चोळके,दत्तात्रय सांबारे,सतीश जगताप, अमोल लोंढे,प्रकाश काळे, अमोल साळुंके,आजीनाथ सांबारे, रुस्तम मोगल,सुभाष सांबारे आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या