महसूल मंत्री विखे पाटील व अँड काळे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावे आकारी पडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला..:-जेष्ठ नेते गंगाधर पा.चौधरी

चितळी (प्रतिनिधी :- प्रवीण दरंदले):कर्तव्यदक्ष महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अँड.अजित काळे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील सर्व आकारी पडीत शेतकर्‍यांच्या भल्यासाठी भूतो न भविष्यती अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावला असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अँड अजित काळे यांच्या संगमाने एक विचाराने शेतकर्‍यांना खऱ्या अर्थाने न्याय भेटला आहे श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावे आकारी पडीक शेतकर्‍यांनी अनेकदा आंदोलने उपोषण असे अनेक पर्याय अवलंबून न्याय मिळावा म्हणुन सातत्याने लढा दिला आहे. यालढ्याला आता कुठेतरी यश मिळाले आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच सर्व शेतकर्‍यांना जमीन देण्याची घोषणा केली शेतकर्‍यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे यामुळे शेतकर्‍यांना स्वतःच्या हक्काची जमीन मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले यामुळे येथील अनेक शेतकर्‍यांचा अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत असे प्रतिपादन खंडकरी चळवळीचे तथा भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर पा.चौधरी यांनी केले.चौधरी पुढे म्हणाले की यामुळे राज्य सरकारला योग्य निर्णय घेणे सोपे झाले आहे शेतकर्‍यांनी शांततेत या संधीचा फायदा घ्यावा राजकीय श्रेयापाई कुठलीही चढा-ओढ न करता या सर्व मेहनतीचे फळ सर्वानी संयमाने घेतले तरच आकारी पडीत जमिनीचा ताबा सर्व शेतकर्‍यांना योग्यतेने मिळेल याकामी शेतकर्‍यांनी शांतता संयमा राखणे आवश्यक आहे जेणे करून आपल्याला योग्य पद्धतीने आकारी पडीत शेतजमिनीचा ताबा मिळेल शक्यतो आपापसातील वाद हेवेदावे असे काही घडल्यास शासकीय अधिकारी व सरकार आपल्याला याकामी तत्परतेने मदत करू शकणार नाही याकामी सर्वच पक्षांनी व नेते मंडळींनी सहकार्य केले आहे स्व.बाळासाहेब विखे पाटील,कॉ.महादेव गायकवाड,रामराजे निंबाळकर, जयंतराव ससाणे, अण्णा पाटील थोरात आदींनी येथील शेतकर्‍यांना नेहमीच पाठबळ दिले आहे त्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अँड अजित काळे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावे अकारी पडीत शेतकर्‍यांना जमिनी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे लवकरच शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीवर ताबा मिळणार आहे सर्व शेतकर्‍यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे.इंग्रज सरकारने ज्या अर्थाने ह्या जमिनी घेतल्या त्या हेतूने भंडारदराचे पाणी याजमिनीत बारा महिने फिरले पाहिजे होते यामुळे शेतकर्‍याचे पिकांचे उत्पादन वाढले असते यासाठी स्वतंत्र धरण बांधले आहे याच हेतूने शेतकर्‍यांच्या माय बाप सरकारने भंडारदर्याचे बारामाही पाण्याच्या सहित सिलिंग कायदा न लावता मोकळ्या मनाने शेतीसाठी पाणी द्यावे जेणे करुन खंडकरी शेतकर्‍यांचा उत्कर्ष होण्याचा हेतू पूर्णपणे साध्य होईल.. गंगाधर चौधरी,जेष्ठ नेते,खंडकरी चळवळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या