तसेच विद्यार्थ्यांबरोबर शेतकऱ्याचे मोठे हाल होत आहे.अश्या सर्वच मुख्य वाहतूक रस्त्यांची खड्ड्यामुळे दुरावस्था झाली.या रस्त्यांची चाळण झाली.तर काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे मोठमोठ्या खडड्यांनी तर तलावाचे रूप धारण झाल्यामुळे रस्ता चिखलमय बनला त्यामुळे रस्ता चिखलमय झाले असल्याची सध्याची वस्तूस्थिती पहावयास मिळत आहे.ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती कोणी करायची हा गंभीर विषय आहे.काही दिवसापूर्वी माजी खासदार सदाशिव लोखडे यांच्या विकास निधीतून तरतूद केली असल्याचे अशी माहिती स्थानिक सांगत असून त्यावर काहीही झाले नसल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. मात्र तर निवडणूकीच्या तोंडावर आल्यामुळे ही राजकीय निव्वळ बोळवण तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून माजी -खासदार तसेच आमदारांच्याविरुद्ध रोष निर्माण झाला.त्यावर कोणीतरी ररत्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मात्र तेरी भी चूप मेरी चूप ही भूमिका घेऊन हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेऊन राजकीय पुढारी गप्प बसलेले दिसत आहे. वाकणवस्ती ररत्याबाबत (दि 6 )2023 रोजी इजिमा 21 ते वाकणवस्ती पर्यंत खडीकरण तसेच डांबरीकरण करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली होती,त्यावेळी ना.विखेंनी संबंधित प्रशासनाला त्यावर कारवाई करावी.असे आदेश दिले होते.मात्र त्यावर बारा महिने उलटूनदेखील कोणतीही कारवाई प्रत्यक्षात झाली नसल्याने यावर प्रश्न उपस्थित होत आहेत..........चौकट - अहो....खासदार साहेब...... आमच्याकडे तरी पहा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्वरित या ररत्याबाबत लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करत असून खासदार स्थानिक विकास निधीतून प्रयत्न करावेत.आम्ही तुमच्याच्या मतदारसंघातील आहोत बर... का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
वाकणवस्ती रस्ता झाला चिखलमय, रस्त्याला वाली आहेत तरी कोण? रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक हैराण
श्रीरामपूर (प्रतिनिधी :- भरत थोरात ): तालुक्यातील उक्कलगाव - वाकणवस्ती येथील ग्रामीण भागातील मुख्य ररत्याची दुरावस्था बिकट झाली आहे. हा रस्ता दळणवळणासाठी महत्वाचा असून ह्या ररत्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. मात्र ररत्यावर वाहन चालकांना वाहने चालविताना खुप मोठी कसरत करावी लागत असून त्यामुळे शेतकऱ्या ना प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करत आहे.विशेष म्हणजे याच ररत्याला जिल्हा परिषदेची वाकणवस्ती शाळा या रोडवर आहेत.काही दिवसापूर्वीच या ररत्यावर खडीचे एक डंपर आणून टाकले, त्यामुळे काल ते परवापासून परिसरात पाऊस कोसळत असून याच आणखी अडचणी निर्माण झाल्या आहे.
0 टिप्पण्या