धर्मांतर करण्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस गोंडेगाव येथील घटना

श्रीरामपूर (वार्ताहर) :- तालुक्यातील गोंडेगाव येथे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी राजेंद्र मधूकर लोखंडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावातील मौलाना (पूर्ण नाव माहिती नाही )बादशहा उर्फ शकील सय्यद (राहणार गोंडेगाव ता.श्रीरामपूर ) दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सविस्तर समजलेली हकीगत अशी आहे की,गावातील एका अल्पवयीन मुलास अजान -नमाज पठण करून घेत जात खळबळजनक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली.त्या मुलास हिंदू धर्मांतून मुस्लीम धर्मांत प्रवृत्त करण्याचा प्रकार समोर आला.फिर्यादी राजेंद्र लोखडे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे सोमवारी (दि.26) ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी मी माझ्या परिवाराबरोबर माझ्या राहत्या घराच्यापाठीमागे बाजूस जुने पडलेल्या घराच्या जागेवर माझा तेरावा वर्षीय अल्पवयीन मुलगा त्यांच्या तो गुडघ्यावर बसून त्यांचे दोन्हीही हात काहीतरी अवस्थेत बसलेला दिसला.त्यांच्या तोंडातून काहीतरी उच्चार करत असताना पाहिले.फिर्यादी म्हणाला की, तू हे काय करत आहेस.त्यावेळी मी मुलाला विचारले असता त्यांने सांगितले की, मुलगा म्हणाला मी अजान - नमाज पठण करत आहे.तुला कोणी शिकविले तो म्हणाला गावातील मैलाना यांनी शिकविले.असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मैलाना म्हणाला तू आमच्या धर्मांत आला पाहिजेत, नाही आला तर तुला दोरी बांधून टाकू मारून टाकू,जर यांची वाच्यता कुठे केली तर, तुमचे गावात एकच घर आहे. तुला व तुझ्या घरांना मारून टाकूअशी धमकी दिली.
त्यावर फिर्यादी व पत्नी यांनी मुलाला विचारले असता तुला कोण घेवून जात होते तो म्हणाला बादशहा उर्फ शोएब शकील सय्यद याने मागील सुमारे सात महिन्यापासून मस्जिदमध्ये घेवून जात होता.अशी माहिती दिली असून माझाअल्पवयीन मुलगा असल्याकारणाने त्याच्या वयाचा गैरफायदा घेऊन गावातील मुस्लीम समाजाचे मौलाना व बादशहा उर्फ शोएब शकील सय्यद यानी त्यास काहीतरी फूस लावून त्याला हिंदू महार धर्मातून मुस्लीम धर्मामध्ये प्रवृत्त केले. जरी नाही आला तर तुला व तुझ्या घरांना जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस अधिक तपास करत आहे.

 गोंडेगाव येथे काही दिवसापूर्वीच आराध्य दैवत श्री गणपती मदिरांच्या चौथ्यावर काळ्या पिशवीत मांस आढळल्याची घटना समोर आली होती.त्यामुळे संप्तप्त गावकऱ्यांनी गाव बंदची हाक दिली होती.त्यांनंतर कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाने यावर प्रकरणावर दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे गावकरी आणखी आक्रमक झाले.चौकशीअंती तपासाचे चक्रे फिरवून काही व्यक्तीचे नाव पोलीस प्रशासनाने जबाब नोंदविले त्यावरून हा प्रकार उघडकीस आला........ कुपन जर शेतात खात असेलतर विश्वास ठेवायचा कोणावर असा सरपंच सागर बढे यांनी असा सवाल उपस्थित केला असून त्या एका पोलीस कॉन्स्टेबल आणि लेडी कॉन्स्टेबल यांनी जबाब बदलून दुसऱ्याचे नाव घे असे सांगत त्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरपंच बढे यानी प्रसारमाध्यमाशी बोलताना सागितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या