राहाता (प्रतिनिधि :- दिनेश सापिके) - तालुक्यातील एकरुखे गावातील शेतकरी भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नविन गॅस टाकी लावण्यासाठी त्याचे सफेद झाकन उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु झाली असता हि बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षात
आल्यानंतर त्यांनी गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न क रून ही देखील गळती सुरुच राहिल्याने सुरक्षितेचा उपाय म्हणुन त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणत त्यांनी पाण्यात फेकली मात्र त्यावेळी ला गॅसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला हा गॅसघराबाहेर असलेल्या चुल्हीपर्यंत पोहचल्याने गॅसने पेट घेतला त्यामुळे आसपास असलेले नऊ जण तसेच चार जनावरे होरपळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
जखमींना प्रवरा ग्रामिण रुग्णालयात हलविले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.तर जनावराना राहाता येथिल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन वेंदे व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.नितिन निर्मळ यांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होत उपचार केले आहेत. तर यामध्ये भाऊसाहेब वायकर हे गॅस गळती होत असलेले सिलेंडर घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय अडकल्याने त्यांचा पाय फॅक्चर त्यांच्यावर देखिल लोणी येथिल प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत
दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा.यांनी या जखमींची त्वरीत रुग्णालयात जावून जखमीची भेट घेतली असुन वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखिल चर्चा करुन त्यांच्या प्रकृती विषयी माहिती घेतली आहे. याप्रसंगी एकरुखे येथिल सरपंच जितेंद्र गाढवे गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक जालिंदर गाढवे कृषी उत्पन्न बाजार समिती
माजी संचालक देवेंद्र भवर सोपान कासार अनिल गाढवे विनोद गाढवे राजेंद्र वायकर विजय वायकर यांनी घटनास्थळी त्वरीत येवुन जखमींना उपचारासाठी हलविण्यास मदत केली
0 टिप्पण्या