जळगाव-अयोध्यानगर येथील मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन; वनविभागाने पिंजरे लावावे नागरिकांची मागणी.
जळगाव (प्रतिनिधी :- प्रवीण दरंदले)जळगाव ता.राहाता येथील अयोध्यानगर परिसरात मानवी वस्तीच्या आसपास बिबट्याची अचानकपणे वर्दळ वाढल्याने नागरिकांच्या मनात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील बर्याच दिवसापासुन अयोध्यानगर परिसरात बिबट्या फिरताना दिसत आहे येथील विजय टिळेकर यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात परवा रात्री ९ वाजेच्या व पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने येथील नागरिकांची भीती खुप वाढली आहे जळगाव भागात देखील बिबट्याचा जास्त प्रमाणात वावर वाढला आहे नागरिकांना बिबट्याच्या भीतीपोटी घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे वनविभागाने जळगाव-अयोध्यानगर परिसरात मानवी वस्तीच्या जवळील परिसरात दिसत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावे अशी मागणी येथील नागरीक शंकर नाना चौधरी, विजय टिळेकर, प्रवीण जगताप,प्रसन्न धुमाळ,अरूण टिळेकर, दिपक मुळे, अनिल जोशी आदींनी केली आहे.
0 टिप्पण्या