श्रीरामपूर - तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात वैद्यकीय प्रॅक्टीस करीत असलेल्या एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी सांगितले, की आरोपी अनिस
कसम शेख हा निपाणी वडगाव शिवारात निपाणी फाटा येथे त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी शासनमान्य मेडिकल काउन्सिलची कोणतीही आवश्यक पदवी नसताना तो अनधिकृतपणे रुग्ण तपासत होता. त्याच्या
विरोधात कारवाई करण्याची मागणी एका संघटनेने केली होती. त्यानंतर माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने शेख याच्या दवाखान्यात जाऊन पाहाणी केली. यावेळी केलेल्या तपासणीत शेख याच्याकडे कोणतीही पदवी
आढळून आली नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात डॉ. उन्मेष लोंढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२२/२४ नुसार शासन निर्णय १९ ऑगस्ट २००० नुसार वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९५१ चे कलम ३३, ३३ ए अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
वैद्यकीय पथकामध्ये आरोग्य पथकामध्ये डॉ. पी. आर. जाधव, डॉ. उन्मेश लोंढे, डॉ. दृष्टांत चौधरी, तालुका सुपरवायझर, प्रदीप बर्डे, काकडे, कोठुळे, भाऊराव खडके, गायकवाड, अमोल गमे, मयूर पठारे, शेख, रमेश मोरे यांचा समावेश होता.
0 टिप्पण्या