दारू प्यायला पैसे न दिल्याने एकावर चॉपरने वार श्रीरामपूर शहरातील घटना

श्रीरामपूर : दारूला पैसे दिले नाही, म्हणून त्याचा राग मनात धरून एकाला धारदार चॉपरने वार करून जखमी करण्याचा श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात प्रकार घडला आहे. याबाबत ज्ञानेश्वर भगवान बावस्कर, (वय २८), धंदा-मजूरी, रा.गोंधवणी घरकुल, श्रीरामपूर याने पोलिसात फिर्याद दिली. त्याने म्हटले की, रात्री ८.३० च्या सुमारास जेवण करून आपण चक्कर मारण्यासाठी घराबाहेर गेलो.घराजवळच गोंधवणी चर्चसमोर उभा असताना तेथे माझ्या ओळखीचा लुकेश वाघमारे आला व त्याने माझ्याकडे दारू प्यायला पैसे मागितले.परंतु, आपल्याकडे पैसे नाही,आपण कोठून पैसे देऊ? असे त्याला म्हटल्याने त्याला त्याचा राग आला.त्याने आपल्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातातील धारदार चॉपरने आपल्यावर वार केला. त्यामुळे आपण जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सदर जखमी ज्ञानेश्वर बावस्कर याला सुरूवातीला कामगार हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला लोणी येथे हलवण्यात आले आहे.याच्या फिर्यादीवरून लुकेश वाघमारे याच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या