बदलापूर अत्याचाराचा निषेधार्थ शिवसेनेचे उबाठा गटाकडून राहुरी येथे तोंडाला काळ्याफिती लावून मुक आंदोलन !

राहुरी (प्रतिनिधी :- राजेंद्र परदेशी)- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चिमूरड्या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे अहमदनगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरात शनिमंदिरासमोर न्यायालयाचे आदेशाचे पालन करीत बदलापूर येथे झालेल्या चिमूरड्या बालिकांवर अत्याचाराचा तीव्र निषेध करीत तोंडाला काळ्या काळ्याफिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले . यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.महाराष्ट्रभर गाजलेल्या या बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व त्याचा फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी आंदोलनकर्त्यांची भावना आहे. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी उबाठाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे उपजिल्हा प्रमुख भागवत मुंगसे हमीद पटेल सुनील शेलार पोपट शिरसाठ रमण खुळे नंदू हरिश्वद्रे भरत धोले विजय शिरसाठ सुरेश काचोळे विलास जाधव सचिन क्षिरसागर दिपक पंडित बाळा पोटोळे काकासाहेब शिंदे भारत पवार भारत पिंपळे बाळासाहेब शिंदे राहूल चोथे राजू कासार रमजान शेख माऊली बेलकर कुंदन जगधने आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. मात्र आदोलन सुरु असताना शहरात पाऊस सूरू होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या