कर्नाटकातून तीन मार्गांनी आवक; विना क्रमांकाच्या वाहनांचा वापर
पोलीस, अन्न-औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष..?
प्रतिकात्मक फोटो (सौजन्य गुगल) |
श्रीगोंदा : दादा सोनवणे
श्रीगोंदा तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात आज मध्यरात्री मोठ्या प्रमाणात गुटख्याची तीन मार्गांनी आवक होणार आल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे 'रात्रीस खेळ चाले गुटखा तस्करांचा' असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे ग्रामीण पत्रकारांपर्यंत पोहोचणारी ही बातमी पोलिस आणि अन्न औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत कशी पोहोचली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंद्यासह नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटखा मिळत नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांना तसेच पुरवठा करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. त्यामुळे आज रात्री ९ चे सुमारास कर्नाटक राज्यातून दोन मार्गानी श्रीगोंद्यासह अहमदनगर शहरात गुटखा पोहचविला जाणार आहे. हा गुटखा अशोक लेलँड कंपनीच्या सीलबंद कंटेनर मधून आणला जाणार असून त्याच्यासोबत दिल्ली पासिंगचे बनावट नंबर असणारी लाल कलरची काळ्या काचा असणारी स्विप्ट तर मरून कलरची आय ट्वेन्टी कार असणार आहे. विशेष म्हणजे सर्व गाड्याचे नंबर बनावट असणार आहेत. हा माल पोहचल्यावर दोन पिकअप आणि ओमीनी यांच्या साह्याने सगळीकडे माल वितरित केला जाणार आहे.
माल येण्याचा पहिला मार्ग असा... कर्नाटक-हातकणंगले -सांगली-मायणी-दहिवडी -फलटण बारामती-दौंड- पहाटे ३ ते ४ दरम्यान श्रीगोंदा तसेच पहाटे ४ ते ५ दरम्यान अहमदनगर
तर दुसरा मार्ग.... कर्नाटक-निपाणी-कागल-कोल्हापूर-कराड-सातारा-फलटण-बारामती-दौंड- रात्री ३ ते ४ दरम्यान श्रीगोंदा - पहाटे ४ ते ५ दरम्यान अहमदनगर या पोहोचणार आहे
तर कर्नाटक -सोलापूर -करमाळा मार्गे नगर असा कोट्यवधी रुपयांचा गुटखा अनेक मार्गानी अहमदनगर आणि श्रीगोंदा या ठिकाणी गुटखा आज रात्री पोहचवला जाणार आहे. यावर पोलीस प्रशासनासह अन्न आणि औषध प्रशासन नेमकी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0 टिप्पण्या