मागासवर्गीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डॉ.कुटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा ; बहुजन टायगर फोर्सची मागणी

श्रीरामपूर: मागासवर्गीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डॉ.कुटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन टायगर फोर्सच्या वतीने करण्यात आली आहे या प्रकरणात श्रीरामपूर येथील प्रसिद्ध डॉ.रविंद्र कुटे यांच्यावर (दि.५) रोजी गुन्हा रजि.०७८९/२०२४ नुसार गुन्हा दाखल झालेला नाही त्यांना अद्याप अटक झालेली नाही सदर गुन्हा दाखल करणारी पिडीत मुलगी मागासवर्गीय आहे 'लॉ' कॉलेजात शिक्षण घेत आहे. डॉ. कुटे यांनी तिची विचारपूस करुन ती मागासवर्गीय असल्याची खात्री केली तिच्या सोबत गैरवर्तन केले.याप्रकरणी अनुसूचित जाती.अनु.जमाती प्रतिबंधक कायदा अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन टायगर फोर्सच्या वतीने करण्यात आली यावेळी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले यावेळी बहुजन टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष संजय रुपटक्के अशोक भाई बागुल सामाजिक कार्यकर्ते योगेश बनसोडे रिपाई जिल्हा उपाध्यक्ष अंतवन शेळके तालुका कार्याध्यक्ष गोविंद कांदे गणेश जायगुडे दादासाहेब बनकर मतीन शहा नाना गांगड गणेश रूपटक्के रमेश वाघमारे कार्तिक बकरे सागर कांबळे सुनील साळवे मिलिंद मोरे रवी साबळे आदीं कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.निवेदनात म्हंटले आहे की डॉ.कुटे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने इंडियन मेडीकलचे असोसिएशनचे अध्यक्ष सेक्रेटरी पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले व वृत्तपत्रात बातमी दिली त्यात त्यांनी असे म्हटले की सदर गुन्हा खोटा असून खंडणीचे सत्र चालू आहे यावरून त्यांनी पोलीस यंत्रणेतर दबाव टाकून आंदोलन करणारे खंडणीखोर आहे असे त्यांच्या बातमीवरुन निदर्शनास आले आहे मागासवर्गीय मुली खोटया केसेस करतात अशी जाहिरपणे बातमी दिली समाजाची बदनामी केली.यावर अब्रूनुकसान भरपाई नुसार गुन्हा दाखल व्हावा.डॉ.रविंद्र कुटे यांनी 'लॉ' कॉलेजच्या विद्यार्थीनीशी गैरवर्तन केल्याचे माहिती असताना पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी डॉ.कुटे यांना जाणीवपूर्वक अटक केली नाही त्यांची त्वरित अटक व्हावी अशी मागणी करण्यात आली.यासाठी श्रीरामपूरातील कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून रस्ता रोको केला त्यावेळी शहर पोलीस स्टेशन श्रीरामपूर यांनी जाणीवपूर्वक डॉ कुटे यांना पाठीशी घालण्यासाठी व प्रकरण दडपण्याच्या हेतूने कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्याच्या हेतूने रस्तारोको केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.सदर रस्तारोकोची पूर्वसुचना देवूनही जाणीवपूर्वक दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा.संबंधितांवर कायदेशिर कार्यवाही व्हावी आमच्यावरील रस्तारोको संदर्भातील गुन्हे मागे घ्यावे अन्यथा मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११-०० वा.सर्व कार्यकर्त्यांसोबत मेनरोड श्रीरामपूर येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा बहुजन टायगर फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या