सुजय विखेंनी आधी राहत्याची चिंता करावी मग जिल्ह्याच्या बाता कराव्या - रणजित बोठे पाटील.

राहाता :- सुजय विखे पाटील यांनी आता आपण माजी खासदार आहोत याचे भान ठेऊन मोठ्या वल्गना कराव्या.अलीकडे भाषण करताना ते म्हणाले जिल्ह्याचा विकास करू पण आपल्या राहता मतदारसंघातच शेकडो प्रश्न रोज उभे आहे त्यावर काम करण्याची गरज आहे.एकदा आपले धड करा मग बाहेरचे सुधारायला जा असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे पाटील यांनी विखे पाटील यांना केला आहे.
निळवंडे चाऱ्यांचे आणि पाण्याचे प्रश्न,अनेक तलाव भरले गेले नाही,रस्त्याची अवस्था न विचारलेली बरी,नगर मनमाड जणू काही तीन पिढ्यांची देणं आहे अशी समस्यांची जत्रा आधीच आपल्याकडे आहे. दुसऱ्यांची गाडी ओढायला जाताना आपली मात्र चाक गळून पडली आहे हे पाहणे गरजेचे आहे.पावसाचे अनियमितता असल्याने पाट पाण्याचे नियोजन सुजय विखे यांचे वडील पालकमंत्री असून देखील कोलमडले आहे.आजू बाजूचे मतदारसंघ पाहून आपल्या मतदारसंघाची मात्र आता चिंता वाटू लागली आहे.

तीन पिढ्यांची सत्ता असूनही विखे पाटील कुटुंबाने राहता मतदारसंघात दैनंदिन प्रश्न देखील आजवर सोडवले नाहीत.वीज,पाणी,रस्ते,रोजगार हे साधे मूलभूत प्रश्न जर इतके वर्ष निकाली निघाले नसतील तर दुःखद आहे.निवडणूक आली की मग या प्रश्नांची सोडवणूक आम्ही कशी करणार याचे मोठे मोठे आश्वासने देण्याचे काम केले जाते.जिल्ह्यात काय विकास करायचा ते करायला जिल्ह्यातले मोठे नेते सक्षम आहे आपण सध्या निदान राहता आणि शिर्डी परिसरात असणाऱ्या समस्या डोळे उघडुन बघाव्या.अनेक गावांना बस उपलब्ध नाहीत,जायचे तर रस्ते धडाचे नाही त्यामुळे विद्यार्थी पालकांचे हाल होतात.फक्त भाषण बाजी करून विकास होणार नाही त्यासाठी जनतेचे प्रश्न आपण एवढे वर्ष का सोडवले नाही याचे देखील चिंतन त्यांनी करावे असे बोठे पाटील शेवटी म्हणाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या