श्री सिध्दीविनायक पतसंस्था,श्रीरामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा अपूर्वा हाॅल येथे उत्साही वातावरणात पार पडली,त्यावेळी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.वासुदेवजी काळे यांनी 13% लाभांशासह सभासदासाठी विवीध नाविण्यपुर्ण योजना यावेळी जाहीर केल्या.सुरवातीस जेष्ठ सभासदांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन होवुन सभेस सुरवात झाली.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोलजी जोशी यांनी पत्रिकेवरील विवीध विषयांची मांडणी केली,त्यावर सभासदांनी चर्चा करुन विषय पत्रिके वरील सर्व विषयांनी एकमुखी मंजुरी दिली.संस्थेच्या संचालिका डाॅ.पूर्वाजी काळे यांनी सभासदांचे स्वागत केले,आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.सोमनाथजी लोखंडे यांनी संस्थेच्या कामकाजाची सविस्तर माहिती सभासदांना देतानाच,आपली संस्था जिल्ह्यातील आर्दश संस्था असुन सर्वाथाने सुद्रुढ संस्था आहे,संस्थेचे अध्यक्ष तथा श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवाराचे कुटुंब प्रमुख श्री.काळेसाहेब यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे व अत्यंत उत्साही,कार्यतत्पर कर्मचार्यांमुळे संस्था प्रगतीपथावर आहे असे सुचित केले.संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.सुनिलजी बोलके यांनी आपल्या मनोगतातुन सहकारी संचालक यांची साथ,सभासदांचा विश्वास व निष्ठावान कर्मचारी यामुळे संस्थेची घोडदौड सुरु असल्याचे नमुद केले.प्रा.डाॅ.गोरखजी बाराहाते यांनी अर्थक्षेत्रात काम कसे करावे याचा वस्तुपाठ श्री सिध्दीविनायक पतसंस्थेने घातला असुन संस्थेचे संचालक मंडळ अभ्यासपुर्वक काम करत असल्या बद्दल समाधान व्यक्त केले.सुनिता म्हसे यांनी आपल्या ओघवत्या व मना पासुन केलेल्या भाषणातुन सर्वांना हसते ठेवत संस्थेवर माझा विश्वास कसा निर्माण झाला,संस्थेचे अध्यक्ष अविरत कसे काम करतात व सर्व कर्मचारी ही संस्थेची असेट असल्याचा उल्लेख केला.यावेळी सर्वश्री प्रा.प्रकाश देशपांडे,श्री.दायमा,श्री.रुषिकेश बोर्डै,श्री.संदिप कोठुळे,अविनाश जोशी,किशोर कुलकर्णी,श्री.भंडारीसर,श्री.काळेसर,श्री.बेलसरे,श्री.अजय चौधरी,सौ.स्मिता जोशी आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार श्री.बाळासाहेब कोकरे यांनी व्यक्त केले,वार्षिक मिटींगला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.सुत्रसंचलन श्री.दिगंबर कुलकर्णी यांनी केले.
श्री सिध्दीविनायक पतसंस्था सभासदानां 13% लाभांश देणार-वासुदेव काळे
श्रीरामपुर-(प्रतिनिधी :- योगेश कडसकर)
0 टिप्पण्या