चितळी स्टेशन येथे महंत रामगिरीजी महाराज यांचे उत्साहात स्वागत.

चितळी (प्रतिनिधी :- प्रविण दरंदले):सरला बेटाचे मठाधिपती परम पूज्य महंत रामगिरीजी महाराज यांचे राहाता तालुक्यातील चितळी पंचक्रोशीत रविवारी (दि.१) उत्साहात आगमन झाले याप्रसंगी महिला भगिनींनी महंत रामगिरीजी महाराज यांचे तिलक लाऊन औक्षण केले.यामार्गावर ठीक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या चितळी गाव स्टेशन ते चितळी-जळगाव चौफुलीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महंत रामगिरी महाराज यांचे भरपूर समर्थक जमा झाले होते यावेळी भाविकांनी व ग्रामस्थांनी फुलांची उधळण केली जय श्रीराम असा नारा दिला महंत रामगिरी महाराज यांना समर्थन दर्शविले आहे.यावेळी चितळी ते वाकडी दरम्यान भव्य समर्थन रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये असंख्य समर्थक सहभागी झाले पुढे ही मोटारसायकल रॅली चितळी वाकडी रोडवरील शेळके वस्ती येथे थांबली.. 
येथेही महाराजांचे आगमन झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व जंगी स्वागत झाले महंत रामगिरीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व स्वतः 'जय भवानी जय शिवाजी' अश्या घोषणा दिल्या शेळके वस्ती येथे उभारलेल्या ५१ फुटी भगव्या ध्वजाला महंत रामगिरी महाराज यांनी पुष्पहार अर्पण केला
 श्री खंडोबा मंदिरात प्रवचनाचा सोहळा होणार असल्याने महंत रामगिरी महाराज वाकडी गावाकडे मार्गस्थ झाले यावेळी चितळी जळगाव शेळके वस्ती वाकडी फाटा याठिकाणी असंख्य भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना समस्त हिंदु समाजाचा पाठींबा असल्याचे सर्व समर्थकांनी भाविकांनी सांगितले याप्रसंगी चितळी जळगाव शेळके वस्ती वाकडी फाटा येथील सर्व ग्रामस्थ व समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या