......... चक्क पोस्टानं गुवाहाटीवरुन मागवलं हेरॉईन श्रीरामपूरातील घटना

श्रीरामपूर : भारतीय डाकसेवेद्वारे गुवाहाटी येथून श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थ (हेरॉईन) पार्सलने मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शहरातील पूर्णावादनगर येथील विक्रांत राऊत यानं हे पार्सल ऑनलाइन मागवल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी एन डी पी एस कलमानुसार गुन्हा दाखल करत आरोपीवर कारवाई केली. याबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की गुवाहाटी येथून टपाल सेवेद्वारे एक पार्सल श्रीरामपूर डाक कार्यालयात येणार असल्याची माहिती त्यात अंमली पदार्थ असण्याची शक्यता दाट शक्यता होती अशी माहिती एनसीबी मुंबई कार्यालयाने दिली ते माहितीचे पार्सल नंबरसह अहमदनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस आणि एनसीबी पथकानं डाक विभागाशी संपर्क करुन वार्ड क्रमांक 7 मधील बीटवर असणाऱ्या महिला पोस्टमनला या कारवाईत सहभागी करुन घेत मोठ्या शिताफीन पार्सल मागणी करणाऱ्याला शोधून काढलं. त्यानंतर पार्सल ऑर्डर करणारा आरोपी विक्रांत राऊतला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यासंबंधी अधिक तपासणी करत असताना पोलिसांनी आरोपीचे ऑनलाइन नेटवर्क तपासलं असता,क्रिप्टोकरन्सीमध्ये पैशाची देवाण-घेवाण करुन संबंधीत अंमली पदार्थ ऑर्डर केल्याची माहिती समोर आली.अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी कुरीअर आणि पोस्टाच्या सेवेचा गैरफायदा केला जात असल्याची विधीमंडळ अधिवेशनात राज्य गृह विभागानं अगोदरच कबुली दिली. राज्यभर अंमली पदार्था चे जाळे शहरा शहरात पसरले असून आता नगर जिल्ह्यात देखील अशा पद्धतीने परराज्यातून ड्रग्ज ऑर्डर केल्या जात असल्याने चिंता व्यक्त केली.ऑनलाइन ड्रग्ज आणि सोशल मीडियामुळे अवघे जग हातात आल्यानं गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या श्रीरामपूरात असे किती जण ड्रग्जच्या आहारी गेले आणि याचं लोन कसं पसरतंय हे तपासण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर उभं राहिल्याचे दिसते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या