दारुच्या नशेत खुन केलेले तीन वर्षीय बालकाचे मक्याच्या शेतात फेकलेले प्रेत अखेर सात दिवसांनंतर गारज परीसरात सापडले

वैजापूर :- श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील एका तीन वर्षीय बालकाचा खुन करुन त्यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परीसरात फेकल्याची माहिती शिऊर पोलीसांना रविवारी (दि.९) रोजी मिळाल्यानंतर विरगाव पोलीसांच्या मदतीने श्रीरामपूर पोलीसांनी श्वानपथकाला सोबत घेऊन परीसर पिंजुन काढला होता परंतु पोलीसांना मृतदेहाचा शोध लागला नव्हता.अखेर सात दिवसांनंतर शुक्रवारी (दि.१३) रोजी गारज परीसरातील कचरु सयाजी तुपे यांच्या संभाजीनगर मुंबई महामार्गालगत असलेल्या गट नंबर ६७ मधील मक्याच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी शिऊर पोलीसांना याबाबत माहिती दिली.ते शेतात मक्याच्या शेजारी भेंडी तोडत असताना त्यांना त्यांना मृतदेहाचा सडलेला दुर्गंध येत असल्याने त्यांनी मक्याच्या शेतात जाऊन पाहिले असता त्यांना लहान बालकाचा शिर नसलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.स्नेहदिप त्रिभुवन असे खुन झालेल्या बालकाचे नाव असुन आरोपी राहुल पोपट बोधक (वय ३०,रा.चांदेगाव ता.वैजापूर ) याने बायकोला नांदायला पाठवत नसल्याने राग मनात धरून साल्याच्या तीन वर्षीय बालकाचे शनिवारी (दि.८) रोजी अपहरण करून दारुच्या नशेत गारज परीसरात स्नेहदिपचा खुन करुन मृतदेह मक्याच्या शेतात फेकून दिला होता. याबाबत शेतकरी कचरु सयाजी तुपे हे शुक्रवारी शेतात काम करत असताना दुपारी दोन वाजता त्यांना मृतदेह आढळला त्यांनी शिऊर पोलीसांना माहिती दिली.शिऊर पोलिसांनी श्रीरामपूर पोलीसांना कळविले.माहीती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी वैभव रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गणेश गोरक्ष यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून जागेवरच शवविच्छेदन करुन मृतदेह वडीलांच्या ताब्यात दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या