चितळी (प्रतिनिधी :- प्रविण दरंदले): श्री गणेश युवा प्रतिष्ठानच्या संयुक्तविद्यमाने नित्यसेवा ब्लड बँक,श्रीरामपूर यांच्या सहकार्याने सरपंच नारायणराव कदम यांच्या संकल्पनेतून चितळी (ता.राहाता) येथे शनिवार (दि.१४) गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले 'रक्तदान करणे ही काळाची गरज आहे' रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे म्हणुन प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे असे मत सरपंच नारायणराव कदम यांनी व्यक्त केले या रक्तदान शिबिरात नित्यसेवा ब्लड बँकचे डॉ.ओम जोंधळे यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले रक्तदान शिबिरात तब्बल ५० महिला व पुरुष,तरुण रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला व रक्तदान केले

सरपंच नारायणराव कदम यांच्या हस्ते शिबिरातील सहभागी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.श्री गणेश युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे चितळी स्टेशन व पंचक्रोशीत सर्वस्तरावर कौतुक केले जात आहे यावेळी सरपंच नारायणराव कदम,शिवाजीराजे कदम,अशोक शिंदे रावसाहेब शिंदे,प्रसन्न धुमाळ श्री गणेश युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर शिंदे ,अविनाश भंडारे, रवींद्र खरात,अमित वायकोस,संकेत शिंदे,राम वाबळे, प्रेम कुऱ्हाडे,शरद पगारे,रवि गायकवाड आदी उपस्थित होते.
"श्री गणेश युवा प्रतिष्ठान मागील १७ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे यावर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले गावकर्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला तब्बल पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे..:- अविनाश भंडारे"
"रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे ग्रामीण भागात असे कौतुकास्पद उपक्रम राबविणे आवश्यक आहे नागरिकांना रक्तदानाचे महत्व कळणे खुप गरजेचे आहे यामुळे रक्तदान करण्याबाबत जनजागृती होईल चितळी स्टेशन परिसरातील नागरिकांनी भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला..:- नारायणराव कदम, लोकनियुक्त सरपंच चितळी"
0 टिप्पण्या