गावठी कट्ट्यासह भाजपाचा माजी पदाधिकारी पकडला

 


शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

श्रीरामपूर:


 येथील भाजपा ओबीसी सेलचा माजी जिल्हाध्यक्ष महेश विश्वकर्मा याला गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला काल दि.१६  सप्टेंबर रोजी रात्री ११:४५ च्या सुमारास शहर पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे.

 याबाबतची पोलीस सूत्राकडून समजलेली  माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना  गुप्त बातमीदारा  मार्फत माहिती मिळाली की श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर, पृथ्वी हॉटेल जवळ एकाकडे कमरेला गावठी कट्टा आहे.


 या माहितीवरून त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, दीपक मेढे यांना माहिती दिली, त्यांनी तात्काळ पृथ्वी हॉटेल येथे जात तेथे उभा असलेला भाजपा ओबीसी सेलचा माजी जिल्हाध्यक्ष महेश विश्वकर्मा याची झडती घेतली असता त्याच्याजवळ कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला.


ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, राहुल नरवडे, अजित पठारे, संभाजी खरात, रमीज राजा आतार, रामेश्वर तारडे, आजिनाथ आंधळे, रघुवीर कारखिले,श्री पौळ यांनी केली. महेश विश्वकर्मा याच्यावर राहुरी व कोपरगाव येथे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या