'राष्ट्रीय सेवा योजना स्थापना' दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ११० स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला पुणतांबे येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री कार्तिकस्वामी मंदिराच्या परिसर स्वच्छ केला विद्यार्थ्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.. प्राचार्य.डॉ.अमीन सैय्यद
पुणतांबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त श्री कार्तिकस्वामी मंदिराच्या परिसरात राबविले स्वच्छता अभियान
पुणतांबा:(प्रतिनिधी:- प्रविण दरंदले) प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी पुणतांबा येथील गोदावरी नदीच्या काठावर स्थित श्री कार्तिकस्वामी मंदिराच्या परिसरात 'स्वच्छता मोहीम' राबवून श्रमदान केले (दि.२४) सप्टेंबर 'राष्ट्रीय सेवा योजना' स्थापनादिनाचे औचित्य साधून रा.से यो च्या सर्व स्वयंसेवकांनी व प्राध्यापकांनी धार्मिक ठिकाणाच्या परिसरात स्वच्छता राखण्याची शप्पत घेतली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पुणतांबे पंचक्रोशीतून पायी रॅली काढली परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले पुणतांबे पंचक्रोशीत जनजागृती केली राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य "नॉट मी बट यू" "एन.एस.एन.एस वी वॉन्ट सक्सेस" अश्या घोषणा दिल्या स्वच्छतेचे महत्त्व सांगुन नागरिकांना याबाबत प्रबोधन केले गोदावरीच्या तिरी असलेल्या श्री कार्तिकस्वामी मंदिराच्या परिसरात नुकतेच गणेश विसर्जन पार पडले यामुळे याठिकाणी सुकलेले फुले,हार पूजेचे साहित्य नारळाचीकरवंटी,प्लास्टिकचा घनकचरा त्याच अवस्थेत पडलेले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी हे सर्व साहित्य स्वच्छ करून कचर्याची विल्हेवाट लावली गणपती विसर्जन कुंडातील निर्माल्य गोळा करून पाणी स्वच्छ केले मंदिरा जवळ असलेले काटेरी गवत काढले झाडांना आळे करून वृक्षारोपण केले स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या ११० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, सचिव मीराताई काकडे डॉ. हरिभाऊ आहेर, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय धनवटे यांनी उपक्रमांचे कौतुक केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमीन सैय्यद राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुरेश शिंदे प्रा.बाबासाहेब म्हसे, प्रा.नंदू सदाफळ, प्रा.शामा धनवटे, प्रा.जयश्री निकम, प्रा. तेजस्विनी पवार, प्रा.सीमा झोजे, प्रा.माधुरी मोकळ स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांनी व्यक्तिमत्त्व विकास साध्य करावा विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा वसा घेऊन स्वच्छता अभियान राबवून ग्राम स्वच्छता अभियान सुरू ठेवावे..:-- प्रा.डॉ सुरेश शिंदे,रा.से यो कार्यक्रम अधिकारी
0 टिप्पण्या