जळगावच्या उपसरपंच पदी दिलीपराव चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार आशुतोष दादा काळे यांनी दिल्या शुभेच्छा

चितळी (प्रतिनिधी :- प्रविण दरंदले): जळगाव (ता.राहाता) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दिलीपराव चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी उपसरपंच सौ.कल्पना शंकर चौधरी यांनी नुकताच उपसरपंच पदाचा राजीनामा दिला सरपंच शिवाजी साबदे यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त असलेल्या उपसरपंच पदाकरीता अर्ज सादर करण्याची सूचना देण्यात आली यावेळी सरपंच शिवाजी साबदे यांच्याकडे दिलीपराव चौधरी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला.यावेळी अध्यासी अधिकारी यांनी दिलीपराव चौधरी यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले यावेळी जेष्ठ नेते गंगाधर चौधरी,श्री गणेशचे संचालक संपतराव चौधरी,चितळी हायस्कूल कमिटी सदस्य शंकरराव चौधरी, ग्रामपंचायत सदस्य पंडित चौधरी,अरुण गायकवाड,जयश्री चौधरी, उषा आदमाने, पुष्पा औताडे, सुनीता चौधरी,श्रद्धा चौधरी, राजेंद्र साळुंके, माजी सरपंच कल्पना चौधरी, बाळासाहेब चौधरी, दयानंद गायकवाड, किरण चौधरी, सुरेश औताडे, मच्छिंद्र चौधरी, संतोष कापसे, अरुण चौधरी, राजेंद्र चौधरी, विष्णु औताडे, युवा नेते अण्णासाहेब कोते, आमदार काळे यांचे स्वीयसहाय्यक दादासाहेब पठारे,प्रसाद सोमवंशी जळगाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी गोटीराम मडके यांनी उपसरपंच निवडीचे कामकाज पाहिले जेष्ठ नेते दिलीपराव चौधरी यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.



राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार आशुतोष दादा काळे यांनी आम्हाला मागील साडेतीन वर्षापासुन सातत्याने पाठबळ दिले यामुळे जळगावात ग्रामपंचायतीच्या माध्यामातून विविध विकासकामे झाले अनेक योजना येथे राबविण्यात यशस्वी ठरलो जळगाव ग्रामस्थांनी व सदस्य पदाधिकाऱ्यांनी आम्हाला ग्रामपंचायतीच्या माध्यामातून काम करण्याची संधी दिली साडेतीन वर्षात मी सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलो:- शिवाजी साबदे,विद्यमान सरपंच जळगाव 

परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून मागील साडेतीन वर्षापासुन जळगावात अनेक विकासकामे मार्गी लागली आम्हाला वेळो-वेळी आमदार आशुतोष दादा काळे यांचे मार्गदर्शन लाभले भरघोस निधीतून गावात अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या जळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास संपादित केला व उपसरपंच पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे हाच विश्वास माझ्या अंतर्गत होणाऱ्या कामांना पाठबळ देणारा आहे..:- दिलीपराव चौधरी विद्यमान उपसरपंच,जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या