गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट;
एकरूखे येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
राहा ता
:तालुक्यातील एकरुखे येथे सकाळच्या सुमारास स्वयंपाक करत असताना गॅस संपल्याने सिलेंडर बदलताना गॅस लिकेज होऊन त्याचा स्फोट झाला होता. यामध्ये परिवारातील ९ जण जखमी झाले असता, यातील सुरेश भाऊसाहेब वायकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील एकरुखे या गावात पंधरा दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. सिलेंडर बदल्यानंतर यातून गॅस लिकेज होत असल्याने सिलेंडर बाहेर आणले. या वेळी बाहेर चूल पेटलेली असल्याने या आगीमुळे सिलेंडरचा भडका उडाला. या घटनेत ९ जणांसह शेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरे देखील भाजले गेले होते. दरम्यान जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यातील सुरेश भाऊसाहेब वायकर या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
जखमींवर उपचार सुरुच
गॅस सिलेंडर स्फोटात परिवारातील ९ जण जखमी झाले होते. यातील एका जणांचा मृत्यू झाला असून अन्य आठ जखमींवर अजूनही उपचार सुरु आहेत. दरम्यान घरातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.
0 टिप्पण्या