फोटो : विजय औटी
पारनेर -
खासदार निलेश लंकेंचे जवळचे सहकारी असलेले राहुल बबन झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी अटकेत असलेले पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचा जामीन अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर मंजूर केला आहे.
६ जून रोजी राहुल झावरे यांच्यावर पारनेरच्या आंबेडकर चौकामधे प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी विजय औटी,नंदू औटी,प्रितेश पानमंद,मंगेश कावरे आदींना दि.७ जून रोजी अटक झाली होती.यामधे विजय औटींसह सहकार्यांवर पारनेर पोलीस स्टेशनला,भारतीय दंडसंहीता कलम ३०७,३२४,३२३,३४१,४२७,१४३ आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात,विजय सदाशिव औटी,नंदू सदाशिव औटी,प्रितेश पानमंद,मंगेश कावरे आदींना अटक झाली होती.
फोटो : राहुल झावरे
यानंतर विजय औटी यांनी जिल्हा सत्र न्यायाधिश अहमदनगर यांचेकडे अॅड.अविनाश लांडे यांचेमार्फत नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.या अर्जावर सुनावणी होवुन,दोन्ही पक्षाचे युक्तीवाद झाले.
यामधे विजय औटी यांच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन,दि.२३ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.विजय औटी यांचे वतीने अॅड.अविनाश लांडे यांनी युक्तीवाद केला होता.अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विजय औटींना जामीन मिळाल्यामुळे विजय औटींच्या कार्यकर्त्यांमधे उत्साह निर्माण झाला आहे.
0 टिप्पण्या