बेलापुरात जैन मदिरातदोन पंच धातूच्या मुर्ती सापडल्या दर्शनासाठी भाविकाची गर्दी

श्रीरामपूर - तालुक्यातील बेलापूर येथील श्वेतांबर श्री संभवनाथजी जैन मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु असतानाच काही दिवसापूर्वीच मंदिराच्या भिंतीमध्ये पार्श्वनाथ भगवानांची भंग पावलेली मूर्ती सापडली होती त्यानंतर काम सुरू असताना पुन्हा पंच धातुच्या भगवान पार्श्वनाथ महाराजांच्या दोन मूर्त्या सापडल्या आहे. बेलापुर ही जुनी बाजारपेठ आहेत येथे अनेक जुने राजवाडे तसेच पुरातन मंदिरेही आहेत त्यातीलच एक जैन मंदिर बेलापुरच्या बाजारपेठेत होते या मंदिराचा जिर्णोध्दर करण्याचे काम मंदिराचे विश्वस्त अजय डाकले यांनी हाती घेतले होते ते काम सुरु असतानाच भिंतीमध्ये भगवान पार्श्वनाथ यांची मोठी मूर्ती सापडली त्यावर सवंत १७४५ असे लिहलेले आहे त्यावरुन हे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे.ती सापडलेली मूर्ती भंग पावलेली आहे.त्यानंतर कालच आणखी दोन लहान मूर्ती सापडली आहे.या सापडलेल्या मूर्ती पुरातन आहेत .त्यामुळे हे मंदिरही पुरातन असुन भाविकांच्या नवसाला पावणारे असावे अशी चर्चा सुरु आहे घटनेची वार्ता समजताच अनेक भाविकांनी मंदिर परिसरात भेट देवुन भगवान श्री पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या