श्री संत निळोबाराय देवस्थान विकासासाठी तब्बल 7 कोटींचा निधी



श्रीसंत निळोबाराय देवस्थान परिसर विकासासाठी तब्बल ७ कोटी १७ लक्ष ६३७ रुपयाचा निधी मंजूर..

 

उपमुख्यमंत्री अजितदादाच विकासपुरुष-अध्यक्ष अशोकराव सावंत


( पारनेर प्रतिनिधी ) : 


राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि प्रतिपंढरपूर व " ब " वर्ग तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्रीसंत निळोबाराय महाराज यांच्या मंदिर परीसर विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल ७ कोटी,१७ लक्ष,६,३७ रुपयाचा भरीव निधी मंजूर करण्यात आल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी दिली आहे.


छाया : दत्ता गाडगे



          आज खर्‍या अर्थाने पिंपळनेरचे नंदनवन झाले श्रीक्षेत्र पिंपळनेर धाकटे पंढरपूर नगरीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी श्रीसंत निळोबाराय देवस्थानच्या विकासासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र " ब " वर्ग अंतर्गत ३ कोटी ५१ लाख ६३७ रुपये आणि राज्यस्तरीय पर्यटन स्थळ विकासांतर्गत या तीर्थक्षेत्रास ३ कोटी ६५ लाख रुपये असा एकूण ७ कोटी १७ लक्ष ६३७ रुपये एवढा भरीव निधी दिला असुन उपमुख्यमंत्री अजित पवारच विकासपुरुष असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगीतले. 


येथील अनेक विकास कामांसाठीचा निधी जिल्हाधिकारी अहमदनगर कोषागार मध्ये वर्ग केला असुन, तसा जीआर राज्य शासनाने परिपत्रक काढले असून शासनाचा आदेश पत्र जिल्हा अधिकारी अहमदनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना पाठवले आहे.

 म्हणून श्रीसंत निळोबाराय संस्थान पिंपळनेरचे अध्यक्ष अशोकराव सावंत व संत निळोबारायांचे वंशज व संस्थानचे कार्याध्यक्ष गोपाळ काका मकाशीर,भाऊसाहेब लटांबळे, पांडुरंग रासकर विणेकरी,पंढरीनाथ गुंजाळ, विश्वस्त सर्व व गावातील संपतराव गाजरेपाटील, गोरक्ष गाजरेपाटील, राजेंद्र रासकर, माजी उपसरपंच संस्थांचे सचिव एल व्ही खामकर, चांगदेव शिर्के,बाळासाहेब गाडे,बी व्ही लटांबळे,अजिंक्य सावंत,विक्रांत गाजरे,हर्षल गाजरेपाटील,बाबासाहेब पवार,वैभव गाजरेपाटील व सर्व ग्रामस्थ यांनी  दि 30 सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी सकाळी १० वाजता  मंत्रालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात भेट घेऊन आदेशाची प्रत ताब्यात घेतली व विकासासाठी एवढा मोठा भरीव निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.



निधीनूसार मंजूर विकास कामे खालील प्रमाणे :

 संत निळोबाराय परिसर भक्त निवास बांधकाम १ कोटी ३६ लाख १९ हजार ३९९ रुपये, प्रवचन हॉल बांधकाम करणे १ कोटी ८४ हजार ९८९ रुपये, प्रसादालय बांधकाम ४९ लाख ७१ हजार ३५० रुपये, मंदिर परिसर रस्ता नंबर एक काँक्रिटी करण करणे ६४ लाख २४ हजार ९८९ रुपये, हे तीर्थक्षेत्र योजने अंतर्गत असून, पर्यटन अंतर्गत संत निळोबाराय मंदिर तीर्थक्षेत्राच्या तीन प्रवेश द्वारांसाठी २६ लक्ष ४३ हजार रुपये, संत निळोबाराय मंदिर परिसरात रस्ता कॉंक्रिटी करण रस्ता नंबर २ कॉंक्रिटी करणासाठी ६४ लाख २५ हजार रुपये, संत निळोबाराय उद्यानात गार्डनमधील पेव्हिंग ब्लॉकसाठी ९ लक्ष ३७ हजार रुपये,संत निळोबाराय उद्यानातील गार्डन व मंदिर परिसरातील सुशोभी करणासाठी १९ लक्ष ९ हजार रुपये, संत निळोबाराय मंदिरपासून ते दशक्रिया विधी घाटापर्यंत घाट बांधणीसाठी नदी तीरावर १ कोटी २ लक्ष ३८ हजार रुपये, मंदिर परिसरात दर्शन बारी बांधण्यासाठी १ कोटी २३ लक्ष रुपये, संत निळोबाराय मंदिर परिसरातील पथदिवे व रस्त्याच्या कडेने दिवाबत्ती साठी २० लाख ३३ हजार रुपये, अशा एकुण ११ कामांना एकूण ७ कोटी, १७ लक्ष,६,३७ रुपयांचा भरीव निधी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी पिंपळनेर नगरीचे नंदनवन करण्यासाठी दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्रतील वारकरी संप्रदायाच्या वतीने, पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक व आभार मानण्यात येत आहे.यानिमित्ताने पिंपळनेर ग्रामस्थांनी मंत्रालयामधे त्यांची भेट घेवुन त्यांचे ऋण व्यक्त करी त्यांचा सत्कार करुन मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या मंजूर झालेल्या निधीमुळे सर्वत्र आनंदमय वातावरण आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या