राहाता:जळगाव (ता.राहाता) येथील रहिवासी नागरीक विजय भास्कर चौधरी यांनी घराजवळील 'पोल्ट्री फार्म' मधुन माश्या व दुर्गंधीचा त्रास होत असल्याने अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत सूचित करूनही मार्ग निघत नसल्याने
ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थेट जळगाव ग्रामपंचायती मध्ये सतरंजी उशी घेऊन निषेध करत ठाण मांडले आहे. सर्वसामान्य नागरिकांना पोल्ट्री च्या माध्यमातून होणाऱ्या त्रासाची तात्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे
जळगाव येथील रहिवासी विजय भास्कर चौधरी यांनी तक्रारी बाबत अधिक माहिती देताना सांगितले की आमच्या घराजवळ असलेल्या पोल्ट्री फार्म मधुन दररोज अतिशय दुर्गंधीचा वास येतो घरात असणार्या जेष्ठ नागरिकांना यामुळे त्रास होतो घरात जास्त प्रमाणात माश्या येतात यामुळे आम्हा सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे माशामुळे कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत प्रशासनाला त्रासाबाबत वारंवार पाठपुरावा केला असताना "पदाधिकाऱ्यांना" अनेकदा तोंडी तक्रारी देऊनही ग्रामपंचायत स्तरावर 'पोल्ट्री फार्म संबंधित' उपाययोजना करणे साठी कुठलाही मार्ग निघत नाही दुर्गंधी व माशामुळे होणाऱ्या श्वसनाच्या त्रासाला परिसरातील सर्वच नागरीक कंटाळले आहे असे विजय चौधरी यांनी सांगितले.
चार महिन्यापुर्वी जळगाव ग्रामपंचायतीने पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत वीडियो शूटिंग करून ग्रामसभा घेतली होती यादरम्यान विजय भास्कर चौधरी यांनी पोल्ट्री फार्म मुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास असल्याचा प्रश्न ग्रामसभेत मांडला होता याबाबत ग्रामसभा झाल्यानंतर (दि.२४) मे रोजी ग्रामपंचायत प्रशासनासमोर ग्रामसभेला पोल्ट्री फार्म च्या माध्यमातून दुर्गंधीचा चा प्रश्न मांडण्यात आला घरापासून साधारणपणे हाकेच्या अंतरावर दोन ते तीन 'पोल्ट्री फार्म' आहेत तेथील माश्या घरात येतात दुर्गंधी मुळे स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे शेजारील पोल्ट्री व्यावसायिकांशी कुठल्याही प्रकारचे वाद होऊ नये म्हणुन याप्रश्नी ग्रामपंचायत स्तरावर सर्वाना अनेकदा विनंती केली पण हा प्रश्न सुटत नाही आहे.
पोल्ट्री च्या माध्यमातून दुर्गंधीच्या तपासाबाबत ग्रामसभेत प्रश्न मांडला होता संपुर्ण ग्रामसभेच्या चित्रफितिचे वीडियो शूटिंगचे मिळण्याबाबत विजय चौधरी यांनी निवेदन दिले होते परंतु ग्रामसभा होऊन तब्बल चार महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अजूनपर्यंत चित्रफित भेटली नसल्याचे विजय चौधरी यांनी माध्यमांना सांगितले सर्व सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची दखल कोण घेणार असा सवाल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना मानवी वस्तीच्या परिसरात पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी "नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट" कशाच्या आधारे दिले याची चौकशी करण्यात यावी ग्रामपंचायत स्तरावर या गोष्टीचा निपटारा होत नसल्यास आम्ही राहाता येथील तहसीलदार साहेब यांना रीतसर निवेदन देणार आहोत अशी मागणी विजय भास्कर चौधरी यांनी प्रशासनाला केली आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडून या प्रश्नी मार्ग न निघाल्यास सोमवार (दि.७) ऑक्टोबर रोजी कुटुंबासमवेत ग्रामपंचायतीत येऊन आत्मदहन करण्याचा इशारा विजय भास्कर चौधरी यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या