बाल गोकुलम अकॅडेमी, कोल्हार येथे भारतीय राष्ट्रपुरुष व कर्तुत्ववान महिला वेशभूषा व कार्यगौरव सादरीकरणाची स्पर्धा पार पडली
कोल्हार (प्रतिनिधी योगेश कडस्कर) :- राहाता तालुक्यातील कोल्हार येथील बाल गोकुलम अकॅडेमी ,कोल्हार बुद्रुक या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भारतीय राष्ट्रपुरुष व कर्तुत्ववान महिला वेशभूषा व कार्यगौरव सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राणी लक्ष्मीबाई ,राजमाता जिजाबाई,सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ ,लोकमान्य टिळक ,शहीद भगतसिंग ,पंडित जवाहरलाल नेहरू,महात्मा गांधी,लाल बहादूर शास्त्री ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद अशा विविध वेशभूषा परिधान करून त्यांनी केलेल्या कार्याचा आणि समाजासाठी दिलेल्या विचारांचा ठेवा उपस्थित विद्यार्थी ,शिक्षक यांच्या समोर सादर केला . आपल्या देशाविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रेम ,आपुलकी ,देशभक्ती जागृत व्हावी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगला अभ्यास व व्यक्तिमत्व तयार करून आंपण सुद्धा चांगले योगदान राष्ट्रपुरुषा प्रमाणे देवू शकतो, हि भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी ,या उद्देशाने हि स्पर्धा घेण्यात आली ,अशी माहिती शाळेच्या मुख्याधापिका सौ. शारदा मोरे यांनी सांगितली
0 टिप्पण्या