चितळी-जळगावात पो.नि. दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 'बालविवाहमुक्त गाव' अभियानाची क्रांतिकारी सुरुवात!

चितळी:(प्रतिनिधी :- प्रविण दरंदले): बालविवाह हा समाजातील एक गंभीर गुन्हा असून, त्याचे परिणाम संपूर्ण समाजाच्या भविष्यावर होतात. याच समस्येवर कायमचा उपाय शोधण्याच्या उद्देशाने, राहाता तालुक्यातील चितळी गावाने ‘माझे गाव बालविवाह मुक्त गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची जोरदार सुरुवात केली. या क्रांतिकारी उपक्रमाचे नेतृत्व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले, ज्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.पो.नि. दशरथ चौधरी यांनी आपल्या भाषणात बालविवाहाचे कायदेशीर आणि सामाजिक दुष्परिणाम उलगडून सांगितले. "बालविवाहा मुळे मुलांच्या शिक्षणाचा आणि वैयक्तिक विकासाचा संपूर्ण नाश होतो. हा केवळ एक सामाजिक अपघात नसून, कायद्याचे उल्लंघन देखील आहे. जर आपल्याला समाजाचा प्रगतीशील विकास साधायचा असेल, तर बालविवाह थांबवणे अत्यावश्यक आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच, गावात कुठेही बालविवाहाची घटना घडल्यास, त्वरित पोलिस प्रशासन किंवा उडान हेल्पलाईनची मदत घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी माझे गाव बालविवाह मुक्त गाव हे अभियान राबविण्यासाठी चालना दिली. या अभियाना मार्फत ग्राम बाल संरक्षण समिती, सखी सावित्री समिती, इत्यादी अश्या समित्या गठीत करून त्यांना सक्रिय करावे. तसेच कायद्या विषयी यावेळी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर बालविवाह होत असल्यास ताबडतोब चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा उडान हेल्पलाईन 9011026495 वर माहिती देऊन रोखण्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते आणि स्थानिक सलागर समितीचे अध्यक्ष गंगाधर चौधरी होते. त्यांनी या मोहिमेचे समर्थन करत, "बालविवाहमुक्त गाव ही संकल्पना अत्यंत आवश्यक आहे, आणि समाजाने या दिशेने एकत्र काम केले पाहिजे," असे सांगितले. सरपंच नारायण कदम यांनीही गावाच्या विकासासाठी बालविवाहासारख्या कुप्रथांना विरोध करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. "आम्ही आगामी ग्रामसभेत ‘बालविवाहमुक्त गाव’ असा ठराव मांडणार आहोत आणि गावातील सर्वजण याला सहमत आहेत," असे त्यांनी सांगितले.चितळी व जळगाव गावांच्या लोकनियुक्त सरपंचांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. कार्यक्रमात उपसरपंच दिलीप चौधरी, स्कूल कमिटी सदस्य शंकर चौधरी, आणि इतर मान्यवरांसह संपूर्ण ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चितळी महाविद्यालयातील ८५० विद्यार्थी आणि ३९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला.स्नेहालय संस्था आणि उडान प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात स्नेहालयचे संचालक हनीफ शेख, श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, स्नेहज्योत TI 2 प्रकल्पाचे संचालक ॲड. प्रसन्न बिंगी,रोटरी क्लब श्रीरामपूर चे अध्यक्ष डॉ. अजित घोगरे, उडानचे प्रमुख प्रवीण कदम आणि विकास सुतार यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. बालविवाहाचा विरोध करण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार प्रवीण दरंदले यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्नेहालय टीम, उडान प्रकल्पाचे प्रवीण कदम, शुभम डहारे, सनी जगताप, सीमा जुनी आणि इतर मान्यवरांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. चितळी-जळगाव गावाचा निर्धार:बालविवाहाचा कायमचा अंत करूचितळी गावाने ‘बालविवाहमुक्त गाव’ ही संकल्पना आत्मसात करून समाजाच्या भविष्याला सुरक्षित करण्याचे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गावाने बालविवाहासारख्या कुप्रथेचा विरोध करण्याचे ठरवले आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन या उपक्रमाला जोरदार पाठिंबा दिला. "चितळी गाव आता बालविवाहासारख्या समस्यांपासून मुक्त होण्याचा संकल्प करत आहे," असे गावकऱ्यांनी अभिमानाने सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या