चांगल्या गोष्टी आत्मसात करुन वाईट गोष्टीचे दहन करा सौ.विखे पाटील

लोणी दि.१३ प्रतिनिधी
रावण दहनाच्या माध्यमातून दिला वाईट गोष्टीचं दहन करा आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्या चांगल्या गोष्टीतून आदर्श समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया हा संदेश रावण दहनाच्या माध्यमातून दिला जात असतो. विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत असतानाच आपणा सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो आपले स्वप्न पूर्ण व्हावेत अशा शुभेच्छा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी रावण दहनाच्या निमित्ताने दिला.

    लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सहकारातून समृद्धीकडे या अंतर्गत प्रवरा नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.लोणी येथे पदमश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महसुल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व डॉ सुजय विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुश्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेलला शारदीय नवरात्र उत्सव २०२४ सांस्कृतिक समिती आयोजित विजयादशमी (दसरा ) निमित्ताने रावण दहन कार्यक्रम जि.प.माजी अध्यक्षा सौ शालिनी ताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी लोणी बु च्या सरपंच कल्पना मैड, संजय आहेर,बापूसाहेब आहेर, डॉ प्रदिप दिघे , डाॅ.आर.ए. पवार यांच्या सह सर्व ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
  यावेळी सौ.विखे पाटील म्हणाल्या, प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीचे जतन भावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आगळावेगळा पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाच्या आनंद जनतेने घेतला. संस्थेच्या १०६ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असताना ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनी देखील दांडिया चा आनंद घेतला. दुर्गा सप्तशती पाठ, टाकाऊ पासून टिकाऊ अंतर्गत पणती आणि आकाश कंदील निर्मिती, नवदुर्गांचे महत्त्व,कराटे प्रशिक्षण, देशातील विविध महिलांनी केलेलं कार्य त्याचे सादरीकरण अध्यात्म आणि नवरात्र उत्सव आदी विषयाची जनजागृती या उपक्रमाच्या माध्यमातून झाली. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या नियोजनातून हा उपक्रम खऱ्या अर्थाने जनतेसाठी सहकारातून समृद्धीकडे हा संदेश देणारा ठरला असे सौ विखे पाटील यांनी सांगताना या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेशही दिला गेला हा सामाजिक एकात्मतेचा संदेश सर्वांनी जपावा असे आवाहन करत विजयादशमीच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
 यावेळी प्रारंभी संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थे अंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा घेत यामध्ये शिक्षक पालक विद्यार्थी याची उत्तम सांगड घालून हा उपक्रम यशस्वी ठरला असल्याचे सांगितले. शेवटी कॅम्पस संचालक डॉ. आर. ए. पवार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या