सुजित झावरे, काशिनाथ दाते, माधवराव लामखडे, विजय औटींचा राष्ट्रवादीत प्रवेश..
( दत्ता गाडगे : पारनेर प्रतिनिधी )
नगर विधानसभा मतदारसंघातील अहमदनगर जिल्हापरीषदेचे माजी उपाध्यक्ष, सुजितराव झावरे,अहमदनगर जिल्हापरीषद बांधकाम व कृषी समीतीचे सभापती काशिनाथ दातेसर,जिल्हापरिषद सदस्य माधवराव लामखडे,पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी,
शिवाजीराव गुजर आदी मातब्बर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीमधे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मातब्बरांच्या प्रवेशामुळे निवडणूक होणार चुरशीची..
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.तालुक्यातील सर्व विरोधी मंडळी अजित पवारांनी एकत्र आणून सर्वांनी एकोपा ठेवत काम करा आशा सुचना अजित पवार यांनी सर्वांना दिल्या आणि पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवारांला सर्वांनी पूर्ण ताकदीने निवडून आणायचे आहे अशा सुचनाही पवार यांनी दिल्या. त्यामुळे पारनेरची विधानसभा निवडणूक यावेळी चुरशीची होण्याची चिन्हे दिसून येत आहे.
अजित पवार पारनेरवर विशेष लक्ष देणार..
अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले असून नगर-पारनेर मतदारसंघात जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, शिवाजीराव गुजर यांनी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडली आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधे प्रवेश केला.तसेच लोकसभेची उमेदवारी घेत त्यांनी नगर दक्षिणचे तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा मोठा पराभव केला.हा पराभव उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना जिव्हारी लागल्यापासुन,अजित पवार यांनी पारनेर तालुक्यावर बारीक लक्ष ठेवल्याचे समजते.याच पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे समजते.
या प्रवेशाचे वेळी आमदार नरहरी झिरवळ,श्रीसंत निळोबाराय संस्थानचेअध्यक्ष मा.मंत्री अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे,संदिप पाटील वराळ फौंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळपाटील आदी उपस्थित होते.
पारनेरची आघाडीची उमेदवारी राणीताई निलेश लंके यांना मिळण्याची शक्यता असल्याने,
त्यांच्या विरोधात त्याच ताकतीचा उमेदवार देण्यासाठी आणि हा मतदारसंघ परत आपल्याकडे खेचुन आणण्यासाठी पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. सध्यातरी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. लंके यांच्या विरोधात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते हेदेखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या