जळगाव येथील रोकडोबा महाराज मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात १०१ दिवे लावून दिपोत्सव साजरा
जळगाव (प्रतिनिधि:- प्रविण दरंदले ):- येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज मंदिरांच्या परिसरामध्ये (ता.३०) 'दीपावली' सणाचे औचित्य साधून आकर्षक अशी विद्युत रोशनाई करण्यात आली यावेळी मंदिराच्या परिसरात १०१ दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यामुळे मंदिराला आर्षक अशी शोभा आली आहे. यापार्श्वभूमीवर जळगाव पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज मंदिर,श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर,श्री महादेव मंदिरासमोरील,श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ अभिवादन करून १०१ दिवे लावून दीपोत्सव हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी परिसरातील सर्वच धार्मिक मंदिरांच्या परिसरामध्ये 'दिव्यांचा लखलखाट' करण्यात आला दीपप्रज्वलन केल्याने परिसर जणू उजाळूनच निघाला वातावरण मंत्रमुग्ध व प्रसन्न झालेले पहायला मिळाले.'दीपावलीच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनातील अंधार दूर व्हावा सर्वांच्या घरी सुख शांती नांदावी समाजाची एकी व्हावी सर्वांचे एकमेकांच्या विषयी आपुलकी व प्रेम वाढावे या हेतूने पंचक्रोशीतील समस्त हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन परिसरात दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले या उपक्रमाला जळगाव पंचक्रोशी मधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला याप्रसंगी जळगाव पंचक्रोशीतील समस्त युवक व ग्रामस्थ दीपप्रज्वलनाच्या प्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 टिप्पण्या