'समोरचे लबाड' आहे ते वेळ मारायचे काम करतील :- आमदार आशुतोष काळे
राहाता:(प्रतिनिधी :- प्रविण दरंदले)विरोधकांना आमच्या विषयी सांगायला काहीच नाही म्हणुन त्यांनी आमची बदनामी सुरू केली.सध्याला मतदारांनाचे मतपरिवर्तन करण्याचे काम चालू आहे 'समोरचे लबाड' आहे ते वेळ मारायचे काम करतील पार ते तुम्हाला 'संजीवनी कारखान्याचे' चेअरमन सुद्धा करतील त्याचसाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत अश्या सूचक विधानातून आमदार आशुतोष दादा काळे यांनी विरोधकांना उत्तर दिले. रविवार (दि.६) कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी -एलमवाडी -पुणतांबा (ग्रामा ६३) दोन कोटी रुपयांच्या राहाता तालुक्यातील चितळी रोड ते पुणतांबे पर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचा 'भूमिपूजन समारंभ' कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा काळे साहेब यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते श्री हनुमान मंदिर एलमवाडी येथे पार पडला यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार काळे म्हणाले की कोपरगाव मतदान संघात मंजुर झालेल्या रस्त्याचे कुठलेही काम खराब झाल्यास त्या ठेकेदारावर शंभर टक्के कारवाई केली जाणार "रस्त्याचे कामे हे सर्व सामन्य जनतेसाठी केली जात आहे आहेत' ती कामे वारंवार होणार नाही म्हणुन रस्त्याचे जे काही कामे होतील ते अगदी व्यवस्थीत व पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे ठेकेदारांनी रस्त्यांची कामे व्यवस्थीत व पारदर्शक पद्धतीने करावी असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी केले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक प्रकाश साबदे होते अनुमोदन सरपंच शिवाजी साबदे यांनी केले सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्र चौधरी यांनी केले यावेळी व्यासपीठावर जळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी साबदे उपसरपंच दिलीपराव चौधरी,शंकरराव चौधरी, माजी उपसरपंच कल्पनाताई चौधरी,ग्रामपंचायत सदस्य जयश्री चौधरी,जळगाव सोसायटी चेअरमन सुरेश औताडे,किरण चौधरी,मच्छिंद्र चौधरी, बाळासाहेब चौधरी,गणेश थोरमोठे,सुरेश औताडे,विजय चौधरी,विष्णु औताडे,बाबासाहेब रक्टे,महेश औताडे,दयानंद गायकवाड,तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्र चौधरी, वाकडीचे माजी सरपंच संपतराव शेळके, गोरख कोते, अण्णासाहेब कोते,ज्ञानेश्वर औताडे, संतोष साबदे, रमेश साबदे, शेखर साबदे, संजय साबदे,दिवाण साबदे, अरविंद साबदे, कॉन्ट्रॅक्टर सागर तक्ते, रविंद्र चौधरी, यांच्या सह वाकडी, जळगाव, एलमवाडी, पुणतांबा येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.एलमवाडी परिसरातील शेतकरी अण्णासाहेब साबदे गट नंबर २३/१ मध्ये वाकडी सबस्टेशन अंतर्गत मेन लाईनवर शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या शेतात रात्रीच्या सुमारास आग लागली यादरम्यान जवळपास दोन एकर उसाचे क्षेत्र व ठिबक सिंचन पाईप लाईन आगीच्या भक्ष्यस्थानी खाक झाली यावेळी कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार आशुतोष काळे यांना उसाच्या जळीता विषय माहिती मिळताच आमदार काळे यांनी तत्परतेने शेतकरी अण्णासाहेब साबदे यांच्याशी संवाद साधला संबंधित शेतातील जळालेल्या उसाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी कामगार तलाठी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे बाबत सूचित केले वीज वितरण कंपनीने तात्काळ पंचनामा करून अवहाल सादर करावा असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी दिले.
0 टिप्पण्या