प्रथम महिला मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त रामपूरवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप

राहाता:(प्रतिनिधी :- प्रविण दरंदले)रामपूरवाडी (ता.राहाता) येथे कोपरगाव विधानसभेच्या प्रथम महिला माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांचा (दि.८) ऑक्टोबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूरवाडी येथील १३० विद्यार्थ्यांंना शालेय साहित्य वाटप केले.रामपूरवाडी गावचे सरपंच संदीप सुरडकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला कु.हर्षिका संदिप सुरडकर हिच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांंना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी सरपंच संदीप सुरडकर यांनी रामपूरवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कार्याध्यक्ष बबनराव काळे, सरपंच संदिप सुरडकर, तंटामुक्ती उपाध्यक्ष विलास अंबडकर, अनिल पवार मा.सरपंच सतीश जगताप,मच्छिन्द्र शिंदे, आसाराम आग्रे मुख्याध्यापक अमोल साळवे सर सतीश पठारे सर लहामगे सर लकारे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या