श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती संचालक मंडळ कर्मचारी सभासद शेतकरी यांनी आनंदोत्सव साजरा केला. गणेश कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तीन हजार रुपये उसाला दर मिळाल्याने चैतन्याचे वातावरण पसरले आहे. कर्मचाऱ्यांना पगार बोनस यासह रिटेन्शन रक्कम मिळाल्याने प्रथमच इतकी आनंदात दिवाळी आम्ही साजरी करतो आहोत अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले असे आ.बाळासाहेब थोरात आणि कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार सर्वांनी व्यक्त केले आहे.२ लाख १७ हजार टन इतके गाळप मागील हंगामात झाले. जिल्ह्यात सहकारी कारखान्यात सर्वाधिक गाळप उतारा गणेशचा निघाला. उसाची उपलब्धता कमी असताना देखील हंगाम यशस्वी करून दाखवला त्याचप्रमाणे चालू हंगामात देखील एकजुटीने कार्यरत राहू. मा.आ.बाळासाहेब थोरात व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अनेक अडचणी आल्यानंतरही कारखाना यशस्वी सुरू केला. अनेक राजकीय अडचणी कारखान्याला कर्ज मिळण्यासाठी आल्या त्यावर मात करून घडी बसविण्यात यशस्वी झालो आहोत.मागील संचालक मंडळाच्या काळात थकित पगार आणि इतर रकमा थकित होत्या.आर्थिक घडी विस्कटून गेली होती त्यामुळे नवीन संचालक मंडळाला अनेक आव्हानांना तोंड देऊन हे प्रश्न सोडवावे लागता आहेत.ऊस पळवा पळवी करून कारखान्याला त्रास देऊ नये आणि गणेश कारखाना विरोधकांनी अडथळे आणू नये.नुकतेच कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना अदा झाल्याने राहता आणि गणेश परिसरात बाजारपेठ फुलण्यासाठी मदत झाली आहे.आमची दिवाळी गोड होण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे आणि आ.बाळासाहेब थोरात यांनी दिलेला शब्द पाळला.नेतृत्वावर विश्वास ठेवला जो सार्थ ठरला आहे.ऊसाला २०२३-२४ हंगामात सर्वाधिक तीन हजार रुपये दर मिळाला आणि कर्मचारी बांधवांचे देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत झाली.यासह सभासद आणि ऊस देणारे बिगर सभासद यांनाही मोफत साखर देण्याचा पूर्वनियोजनाप्रमाने झालेला निर्णय हा कौतुकास्पद आहे याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी चेअरमन सुधीर लहारे,व्हा.चेअरमन विजय दंडवते, ॲड.नारायण कार्ले,भगवानराव टिळेकर, डॉ. एकनाथ गोंदकर,अनिल गाढवे,बाळासाहेब चोळके,महेंद्र गोर्डे ,संपतराव हिंगे अरविंद फोपसे, आलेश कापसे,नानासाहेब नळे,विष्णुपंत शेळके,संपत चौधरी,विनायक देठे, सचिन आहेर,सुभाष कापसे आदींसह अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश कारखाना संचालक,सभासद,कर्मचारी यांचा आनंदोत्सव
" ऐतिहासिक निर्णयांचे स्वागत करत, बाळासाहेब थोरात,विवेकभैय्या कोल्हे यांचे मानले आभार "
0 टिप्पण्या