आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते भाऊ कदम शनिवारी पुणतांब्यात

कोपरगाव (प्रतिनीधी प्रविण दरंदले) :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. आशुतोष काळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम शनिवार (दी.१६) रोजी राहता तालुक्यातील पुणतांब्यात येणार आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाई (अ) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पुणतांबा नगरीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक तथा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार (दि.१६) नोव्हेंबर २०२४ रोजी राहता तालुक्यातील पुणतांबा येथे आ.आशुतोष काळे यांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.आमदार आशुतोष काळे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली आहे राहता तालुक्यातील पुणतांबा भागातील असलेल्या ११ गावांना नेहमीच आपले मानून सर्वस्तरावर मदत केली आहे अकरा गावांना नेहमीच न्याय दिला आहे.पुणतांबा गावातील जुने रेल्वे गेट पासून दुपारी ३ वाजता रॅली निघणार आहे या रॅलीसाठी मतदार संघातील तसेच पुणतांबा गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाई (अ) मित्रपक्षातील समस्त कार्यकर्त्यांनी व मतदारांनी या रॅलीसाठी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या