कोपरगाव विधानसभेसाठी जळगाव-एलमवाडी गावांचे ७१.७८ टक्के मतदान


जळगाव:(प्रतिनिधी:-प्रवीण दरंदले) :- राहाता तालुक्यातील जळगाव-एलमवाडी येथे २१९ कोपरगाव मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बुधवार (ता. २०) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ७१.७८ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली.राहाता तालुक्यातील तब्बल ११ गावांचा समावेश कोपरगाव मतदार संघात होतो त्यापैकी जळगाव व एलमवाडी हे दोन्ही गावे मतदारसंघात समाविष्ट आहेत व केंद्रस्थानी मानले जातात.
जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली.जळगाव- एलमवाडी यादोन्ही गावांचे महिला व पुरुष असे एकूण २९९४ मतदारांचा एकत्रित आकडा आहे. एकूण २९९४ मतदारांपैकी २१४७ सुज्ञान मतदारांनी उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क लोकशाही पद्धतीने बजावत मतदान केले.जेष्ठ, तरुण,विकलांग,महिला, नवीन मतदारांनी मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला याप्रसंगी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत मतदारांनी शाळेच्या परिसरात चांगली गर्दी केली होती दुपारी ३ ते ४ यावेळेत मतदान करण्यासाठी मतदारांची तोबा गर्दी उसळली होती यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पडवीत व मतदान केंद्राच्याा पुढे मतदारांच्य लांबच लांब रांगा पहिला मिळाल्या यावेळी पोलीस प्रशासनाने आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावले.जळगाव-एलमवाडी या दोन्ही गावांचे मिळून २३८, २३९, २४०, २४१ असे एकूण चार वॉर्ड आहेत यात मतदान केंद्र क्रमांक २३८ मध्ये एकूण १०५६ मतदार आहेत यापैकी ७८० मतदारांनी मतदान केले, मतदान केंद्र क्रमांक २३९ मध्ये एकूण ९८६ मतदार आहेत त्यापैकी ६६८ मतदारांनी मतदान केले.मतदान केंद्र क्रमांक २४० मध्ये एकूण ९५२ मतदार आहेत यापैकी ६६९ मतदारांनी मतदान केले, एलमवाडी गावासाठी मतदान केंद्र क्र.२४१ स्थापन करण्यात आलेले होते या वॉर्डमध्ये एकूण ५५६ मतदार आहेत यापैकी ३८० मतदारांनी मतदान केले एकूण चारही बुथ मधील टक्केवारी असमाधानकारक होती पाच ते सहा या वेळेत मतदानाची टक्केवारी वाढेल असे वाटत होते परंतू; ह्यावेळी तुरळक मतदान झाल्याचे चित्र दिसून आले.कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी या ठिकाणचे एकत्रित मतदान ७१.७८ टक्के झालेले आहे.यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला मतदान केंद्रामध्ये महाराष्ट्र शासन निवडणूक आयोगाने पारित केलेल्या सर्व सूचनांचे पालन योग्य रीतीने करण्यात आले मतदान केंद्राच्या आसपासही भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदी होती निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांनी चोखपणे काम पहिले जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला होता.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जळगाव (ता.राहाता) येथील जि.प शाळेमध्ये मतदान करण्यासाठी झालेली गर्दी.(छाया-प्रवीण दरंदले)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या